Saturday, March 29, 2025
HomeनाशिकNashik News : द्राक्षबागेत पकडला बिबट्या; वनविभागाचे दोन कर्मचारी जखमी

Nashik News : द्राक्षबागेत पकडला बिबट्या; वनविभागाचे दोन कर्मचारी जखमी

ओझे | विलास ढाकणे | Oze

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) शिंदवड येथे काल (शुक्रवारी) द्राक्ष बागेत मुक्त संचार करणारा बिबट्या (Leopard) जेरबंद करण्यात आला. मात्र, बिबट्याने वनविभागाच्या (Forest Department) कर्मचार्‍यांवर हल्ला केल्याने दोघे जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, भाऊसाहेब बरकले यांच्या शेतात जनावरांसाठी गवत काढणीसाठी मनोज वाघमारे हा गेला होता. यावेळी त्याने गवतात बिबट्या बघून पळाल्याचे सर्वांना सांगितले. त्यानंतर बरकले यांनी इतरांना सांगुन बिबट्या असलेल्या ठिकाणी दुरुन पाहणी करत ही माहिती ग्रामपंचायत सदस्य अमोल बरकले यांनी वरखेडा बिटचे ज्ञानेश्वर वाघ यांना दिली. यानंतर वाघ यांनी वरिष्ठांना कळवून सर्व टीम घेऊन शिंदवड (Sindwad) येथे पोहचले.

यावेळी बिबट्या जखमी असून देखील हळूहळू चालत शरद बरकले यांच्या शेतात पोहचला. बिबट्या द्राक्षबागेच्या व कांद्याच्या बांधावर बसला होता, यावेळी बिबट्याला बघण्यासाठी पुढे सरसावलेल्या अधिकाऱ्यांवर अचानक बिबट्याने हल्ला (Attack) चढवला. मात्र, अधिकाऱ्यांनी संरक्षक जाळी पुढे करत बचाव करण्याचा प्रयत्न केला. यानंतर सर्व वनाधिकारी व कर्मचारी एकवटून जखमी झालेले शांताराम शिरसाठ व आण्णा टेकनर यांनी बिबट्या धरून ठेवला होता. त्यानंतर बिबट्या जाळीने पकडून ठेवला, परंतु बिबट्या जखमी असून देखील आक्रमक होत असल्याने त्याला पिंजऱ्यात जेरबंद करता येत नव्हते. यावेळी नाशिकहून डॉक्टरांची टीम घटनास्थळी पोहचली आणि बिबट्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात (Cage) टाकत तात्काळ उपचार सुरु केले.

दरम्यान, यावेळी डॉ. हेमराज सुखवल,समर्थ महाजन,राकेश मोरे,तसेच उमेश वावरे, उपवनसंरक्षक नाशिक पूर्व संतोष सोनवणे, सहाय्यक वनसंरक्षक सुशांत पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी रामचंद्र तुंगार, वनपरिमंडळ अधिकारी वणी आण्णा टेकनर, वनरक्षक,ज्ञानेश्वर वाघ, हेमराज महाले, जयराम शिरसाठ,शांताराम शिरसाठ,परसराम भोये यांच्यासह वनविभागाने मोठी कामगिरी पार पाडली.

सकाळी आम्हांला समजले की शिंदवड येथे जखमी बिबट्या दिसून आला आहे. आम्ही तात्काळ शिंदवड गाठले. यावेळी बिबट्याला वनविभागाने पकडुन ठेवले होते. आम्ही बिबट्याला बेशुध्द केले. यावेळी १०८ वर बिबट्याचा ताप होता, त्याच्या पायाला जखमा होत्या. त्यामुळे आम्ही सलाईन देऊन पुढील वैद्यकीय सेवेसाठी नेले.

डॉ. हेमराज सुखवल

शिंदवड येथे जखमी बिबट्या असल्याचे समजल्यानंतर तात्काळ आमची टीम पोहचली. या रेस्क्यूमध्ये बिबट्याने प्रतिहल्ला केला. यात आमचे दोघे कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार आहेत. तसेच त्यांची प्रकृती ठीक असून आमची रेस्क्यू टीम जखमी बिबट्यावर उपचार करत आहे.

सुशांत पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी दिंडोरी


YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident : समृद्धी महामार्गावर अपघात; दोन ठार, २ जखमी

0
वावी | वार्ताहर | Vavi समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) झालेल्या अपघातात (Accident) दोन जण ठार (Killed) झाल्याची घटना आज (शनिवार) पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली...