Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News: ब्राह्मणवाडे, कहांडळ वाडीत बिबट्या जेरबंर

Nashik News: ब्राह्मणवाडे, कहांडळ वाडीत बिबट्या जेरबंर

वावी | वार्ताहर
गेल्या अनेक दिवसांपासून सिन्नरच्या पूर्व आणि पश्चिम भागात बिबट्याने दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. त्यात आज (दि. २ जाने) रोजी ब्राह्मणवाडे परिसरामध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. ब्राह्मणवाडे परिसरात बापू पंढरीनाथ गिते यांच्या सामाईक मालकी गट नंबर 54 येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये रेस्क्यू करण्यात वनविभागाला यश आहे.

कहांडळवाडी मध्ये शोभा गुंजाळ यांच्या क्षेत्रात बिबट्याची दहशत असल्याचे अनेक दिवसांपासून लोकांच्या निदर्शनास आले होते त्यावर वनविभागाने गुंजाळ यांच्या क्षेत्रात गेल्या दहा दिवसांपासून पिंजरा लावला होता. आज सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने गावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आज सकाळी एक बिबट्या पिंजऱ्यात अडकत नाही तोच कहांडळवाडी येथील शेतकरी रामनाथ लोंढे हे मक्याच्या क्षेत्रात पाणी भरत असताना त्यांच्या जवळून दुसऱ्या बिबट्याने धूम ठोकली, त्यामुळे कहांडळ वाडी परिसरात बिबट्याची दहशत कमी झाली नाही उलट आणखी दोन छोटे बिबट्याचे बछडे यांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी सतर्क रहावे असे आवाहन येथील पोलीस पाटील रवींद्र खरात यांनी केले आहे.


यावेळी वनविभागचे उपवनसंरक्षक पश्चिम भाग नाशिक सिद्धेश्वर सावर्डेकर मा.सहाय्यक वन संरक्षक कल्पना वाघोरे मा.वनपरिक्षेत्र अधिकारी सिन्नर प्रादेशिक श्री हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमचे वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक गोविंद पंढरे, वनमजूर रामनाथ सहाणे, पोलीस पाटील कमलाकर रामराजे यांनी या कामी मेहनत घेतली. सदर बिबट्याला जागेवरून सुरक्षित घेऊन सिन्नर मोहदरी येथील वन उद्यान येथे हलवण्यात आलेले आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik Politics : नाशकात मोठी राजकीय घडामोड; दोन माजी महापौर करणार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) धामधुमीत शहरात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये (BJP) असलेले नाशिकचे दोन माजी...