Sunday, October 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन

Nashik News : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन

देशाच्या प्रगती, समृद्धी साठी केली प्रार्थना

- Advertisement -

नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भगवान त्र्यंबकेश्वराचे विधीवत पूजन करून आरती केली व देशाच्या प्रगती, समृद्धी साठी प्रार्थना केली.

दर्शनावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच मंदिर संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत,सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे, तहसीलदार गणेश जाधव, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, विश्वस्त कैलास घुले, रुपाली भुतडा, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे आदी उपस्थितीत होते.

तत्पूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीर्थराज कुशावर्त येथेही विधिवत पूजा केली.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार...