Tuesday, November 3, 2026
HomeनाशिकNashik News : मेनरोड नऊ दिवस वाहनविरहीत; पोलिसांकडून वाहतूक मार्गात मोठे बदल

Nashik News : मेनरोड नऊ दिवस वाहनविरहीत; पोलिसांकडून वाहतूक मार्गात मोठे बदल

​दिवाळी खरेदीची गर्दी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दिपाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या (Nashik) मुख्य बाजारपेठेमध्ये होणारी नागरिकांची गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने पावले उचलली आहेत. ३ नोव्हेंबर २०२६ ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नऊ दिवसांसाठी मध्यवर्ती बाजारपेठेतील प्रमुख सात मार्ग ‘वाहनविरहीत’ घोषित करण्यात आले असून, या काळात सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. पोलीस उपायुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे.  

- Advertisement -

​मेनरोड, रविवार कारंजा, दहीपूल, शालीमार, सांगली बँक परिसर या मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी येतात. यामुळे ऐन दिवाळीत (Diwali) होणारी कसरत टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा व ठरवून दिलेले वाहनतळ (पार्किंग) वापरावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलीस वाहनांना या नियमांमधून सूट देण्यात आली आहे.  

वाहने कोणत्या मार्गाने जाणार?

​मालेगाव स्टॅण्ड ते रविवार कारंजा (सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना)
​दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉईंट
​रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश मंदिर, भद्रकाली
​बादशाही कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा
​नेपाळी कॉर्नर – गा.म.पुतळा – मेनरोड – धुमाळ पॉईंट
​सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉईंट
​रविवार कारंजा ते धुमाळ पॉईंट

पर्यायी मार्ग आणि वाहनचालकांसाठी सोयीचे बदल

​पंचवटी ते मेन मार्केट: पंचवटीकडून येणारी वाहने संतोष टी पॉईंट आणि द्वारका मार्गे इतरत्र जातील व येतील.
​मालेगाव स्टॅण्डकडील वाहतूक: मखमलाबाद नाका – रामवाडी – बायजाबाई छावणी – चोपडा लॉन्स – गंगापूर नाका मार्गे जाईल.
​जुने नाशिक परिसर: सीबीएस – शालीमार – खडकाळी सिग्नल – सारडा सर्कल या मार्गाचा वापर करावा.

​पार्किंग व्यवस्था

वाहनचालकांनी आपली वाहने बी.डी. भालेकर मैदान (शालीमार), रविवार कारंजा, गोदाघाट, गाडगे महाराज पुलाखाली तसेच स्मार्ट सिटीच्या मार्किंग केलेल्या पार्किंगमध्येच लावावीत.

मुद्दे

-​कालावधी: दि. ३ ते ११ नोव्हेंबर २०२६ (९ दिवस).
​-वेळ: दररोज सकाळी १०:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत.
​-आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई हाेणार.
-प्रशासनाने ठरवून दिलेले वाहनतळच वापरा.
​-परिस्थितीनुसार वेळेत किंवा मार्गात बदल करण्याचे अधिकार पोलिसांकडे

ताज्या बातम्या

दिया

दिया मिर्झाच्या व्हिडीओवरून हायकोर्टानं नेत्यांना फटकारलं; डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट...

0
मुंबई | Mumbaiमुंबई महापालिकेच्या प्रदूषणमुक्त दिवाळी जनजागृती मोहिमेवरून सुरू झालेल्या वादावर आता मुंबई हायकोर्टाने भाष्य केले आहे. अभिनेत्री दिया मिर्झाने केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून सुरू...