Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याउघडीप संपणार! उद्यापासून मान्सून पुन्हा होणार सक्रिय!

उघडीप संपणार! उद्यापासून मान्सून पुन्हा होणार सक्रिय!

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जुलै महिन्यात (July Month) विक्रमी मान्सून (Monsoon) बरसल्यानंतर गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा मान्सून सक्रीय (Monsoon) होणार असल्याची माहिती निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उघडीप मिळाल्यानंतरची कामे त्वरित आटोपुन घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे….

- Advertisement -

अधिक माहिती देताना खुळे सांगतात की, येत्या शुक्रवार (दि ०५) पासून अपेक्षित असलेल्या मान्सूनची सक्रियता कदाचित एक दिवस अगोदरच म्हणजे गुरुवार (दि.४) पासूनच संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते जोरदार पावसाने सुरवात होवु शकते. विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातील (south maharashtra) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड यवतमाळ चांदा गडचिरोली या १० जिल्ह्यात २४ तास आधीपासूनच मान्सून सक्रीय झालेला बघायला मिळेल.

कोयना धरणासह (Koyna dam) कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट-माथ्यावरील तसेच त्यापाठोपाठ लगेचच नाशिक-नगर जिल्ह्यातील सर्व धरण क्षेत्रात जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे सिंचन विभागाला (Irrigation dept) नद्या व कॅनॉलमध्ये सध्या सुरु असलेल्या पूर-पाणी विसर्गाला तत्काळ सुरुवात करावी लागण्याचीही शक्यता आहे. नदी- कॅनॉलमधील चालु असलेल्या सध्याच्या पूर-पाणी विसर्गात कपात न करता उलट पुढील ४-५ दिवस कदाचित पूर-पाण्याच्या अधिकच्या विसर्गाच्या निरीक्षणात रहावे लागण्याच्या शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील विशेषतः द. महाराष्ट्रातील भाजीपाला तोडणी व काढणी, विक्री वा साठवणीसाठीचाही विचार या दोन दिवसात लगेचच करावा लागण्याची शक्यता आहे. सध्या पाणीओढ-भास जाणवणाऱ्या पिकांचे सिंचन मात्र विवेकानेच करणे गरजेचे जाणवते. कारण सध्या सिंचन झालेल्या वा चालु असलेल्या सिंचित मका व भाजी पिकासाठी भाकीत केलेल्या येणाऱ्या २ दिवसाच्या अधिकच्या पावसाने मुळीचोकअप अथवा पीकवाढ आचकाही बसू शकेल कि काय, याचा विचारही शेतकऱ्यांच्या मनी असावा, असे वाटते.

…म्हणून होणार मान्सून सक्रीय…

येत्या शुक्रवार (दि. ५) पासुन पुन्हा त्याच्या मूळ सरासरी जागेवर किंवा त्यापेक्षाही अधिक दक्षिणेकडे सरकण्याच्या व त्यामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल.

समुद्रसपाटीपासुन उंच आकाशात ३ किमी ते ७ किमी अंतरादरम्यान मंगळूर, बंगळूर, व चेन्नई या शहरावरून जाणारा पूर्व-पश्चिम एकमेकांविरुद्ध समांतर जाणारा वाऱ्याचा शिअर झोन अधिक अक्षवृत्तीय अंतरावरील उत्तरेकडे म्हणजे गोवा व दक्षिण महाराष्ट्रातील शहरावरून येत्या ३-४ दिवसात शिफ्ट होण्याची शक्यता आहे.

तसेच चेन्नई, नेल्लोर, मच्छलिपटणम ह्या शहरादरम्यान बं उपसागरात पूर्व किनारपट्टीसमोर जमिनीपासून १ किमी अंतरावर असलेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे मान्सून पुढील १२ दिवस महाराष्ट्रासफ द. भारतात सक्रिय राहण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या