Monday, November 25, 2024
Homeनाशिकलाईट-कॅमेरा-अँक्शन; नाशिकला पसंती

लाईट-कॅमेरा-अँक्शन; नाशिकला पसंती

नाशिक । कुंदन राजपूत

नाशिकच्या निसर्ग सौंदर्याची मुंबई, पुणे येथील चित्रपट व मालिका निर्मात्यांना भुरळ पडली आहे. जिल्हयातील अनेक ठिकाणी चित्रीकरणासाठी जिल्हा प्रशासनाकडे निर्मात्यांचे अर्ज प्राप्त होत आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीत शारदा फिल्म प्रोडक्शन ‘वन फोर थ्री’ या चित्रपटाचे त्र्यंबकेश्वरमधील पहिणे व हाॅटेल संस्कृती येथे चित्रीकरण सुरु आहे. तर, स्ट्राॅबेरी पिक्चर्स निर्मित ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचे मखमलाबाद येथील निसर्गरम्य परिसरात चित्रीकरण सुरु आहे.

मागील जुलै महिन्यात ‘लास्ट राईट’ या हिंदी चित्रपटाचे व छोटया पडद्यावरील काही मराठी लोकप्रिय मालिकांनी जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळी चित्रीकरण पुर्ण केले आहे.

दादासाहेब फाळके यांची चित्रपट नगरी ही नाशिकची अोळख. पण चित्रपट व छोट्या पडद्यावरील मालिका निर्मात्यांची पहिली पसंत मुंबई व पुणे या शहरांना होती.

पण करोनामुळे वरील ठिकाणी चित्रीकरण शक्य नसल्याने निर्मात्यांची पावले निसर्ग सौंदर्याने नटलेल्या नाशिककडे वळत आहे.

पावसामुळे जिल्हयाने हिरवागार शालू पसरला अाहे. त्र्यंबकेश्वर, ईगतपुरी, दिंडोरी येथील अनेक ठिकाणचे सौंदर्य खुलून उठले आहे.

जुलै महिन्यात एकदंत फिल्मसच्या ‘अभय सिजन – २’ या मालिकेचे सिन्नर तालुक्यातील घोरवड घाट जंगल परिसर, भगूर -पांढुर्ली नदी पुलावर चित्रीकरण झाले.

ट्रम्प कार्ड प्रोडक्शन निर्मित ‘ माझ्या नवर्‍याची बायको’ या मालिकेचे इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे गावातील मुरंबी या लोकेशनवर चित्रीकरण पूण केले.

स्ट्राबेरी पिक्चर्स निर्मित ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचे शहरातील मखमलाबाद गावात ३१ आॅगस्टपर्यंत शुटींग सुरु राहणार आहे. मनीप्लांट एंटरटेन निर्मित म्युझिक व्हिडिओचे चित्रीकरण देखील निफाड व इगतपुरी तालुक्यातील निसर्गाच्या नवलाईने नटलेल्या परिसरात झाले.

चांदोरी गावातील गोदाकाठावरील खंडोबा मंदिर, ओझरगाव येथील गणपती मंदिर व इगतपुरीतील भावली धबधबा या निसर्गरम्य लोकेशनवर चित्रीकरण पुर्ण करण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या