Tuesday, April 28, 2026
HomeनाशिकNashik News : महापौर-उपमहापौरांनी केली रस्ते व विकासकामांची पाहणी; अधिकाऱ्यांना दिल्या 'या'...

Nashik News : महापौर-उपमहापौरांनी केली रस्ते व विकासकामांची पाहणी; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

नाशिक | Nashik

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील (Nashik Mahapalika Area) प्रलंबित आणि सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा व वेग तपासण्यासाठी आज (मंगळवार) महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे (Himgauri Aher-Adke and Vilas Shinde) यांनी नगरसेवकांसह पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, पूल आणि अन्य नागरी सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

- Advertisement -

आज सकाळी महापौर-उपमहापौरांनी (Mayor and Deputy Mayor) जेहान सर्कल, आनंदवल्ली, बालाजी मंदिर, कवडे गार्डन, अंबिका स्वीट ते अमृत गार्डन तसेच पिंपळगाव बहुला परिसरातील विकासकामांची प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, पुलांचे बांधकाम, भूमिगत वायरिंगचे आणि गटारीचे काम यासह परिसरातील इतर पायाभूत सुविधांच्या सद्यस्थितीची पाहणी केली.

दरम्यान, पाहणी दौऱ्यावेळी अनेक ठिकाणी कामाचा वेग मंदावल्याचे दिसून आल्याने, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना (Officers) आणि कंत्राटदारांना कामाला गती देण्याच्या सूचना महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी केल्या. तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांना दिले स्पष्ट निर्देश

यावेळी महापौर आणि उपमहापौरांनी शहरात ठिकठिकाणी सुरु असलेली विकासकामे विहित मुदतीत पूर्ण व्हावीत, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. तसेच कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष द्यावे,” अशा कडक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पावसामुळे किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे कामे रखडणार नाहीत, याची दक्षता घेण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले.

कोण-कोण होते उपस्थित

यावेळी नगरसेविका अंकिता शिंदे, कविता लोखंडे, इंदुबाई नागरे, नगरसेवक नितीन (बाळा) निगळ, समाधान देवरे, दादा आरोटे, हिरामण बेंडकोळी, रविंद्र काळे, दशरथ लोखंडे, महेंद्र शिंदे, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधिक्षक अभियंता रविंद्र धारणकर, उपअभियंता बांधकाम निलेश साळी, कार्यकारी अभियंता बांधकाम संदेश शिंदे, कार्यकारी अभियंता मलनिस्सारण नरेंद्र शिंदे, शाखा अभियंता बांधकाम संजय गावित, बांधकाम विभाग पश्चिम राकेश पवार, जगन जोपळे मलनिस्सारण विभाग सातपूर आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Nashik Suicide News : सप्तश्रृंगी गडाच्या शीतकड्यावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

0
सप्तश्रृंग गड| प्रतिनिधी | Saptashrung Gadh श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी (Saptashrungi Gadh Darshan) आलेल्या ब्राह्मणवेल ता. साक्री येथील तरुणाने (Youth) शीतकड्यावरुन खोल दरीत उडी घेऊन...