Thursday, May 15, 2025
Homeक्राईमNashik News : चर्चित 'मोक्का' फिस्कटला; सुधाकर बडगुजरांच्या मुलासह साथीदारांना दिलासा

Nashik News : चर्चित ‘मोक्का’ फिस्कटला; सुधाकर बडगुजरांच्या मुलासह साथीदारांना दिलासा

दोषारोप दाखल करण्याची विनंती एडीजींनी नाकारली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना त्यांच्या पुत्राच्या मोक्का प्रकरणात (Mcoca Act) मोठा दिलासा मिळाला आहे. तपासाधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचे दोषारोपपत्र विशेष मोक्का न्यायालयात (Mcoca Court) दाखल करण्यास परवानगी मिळण्याची विनंती अपर पोलीस महासंचालकांकडे केली असता त्यांनी छाननीअंती विनंती अमान्य केली आहे. त्यामुळे जवळपास हा मोक्का तकलादू झाला असून बडगुजरांना दिलासा तर फिर्यादी ॲड. प्रशांत जाधव यांना जबर धक्का बसला आहे.

शहरातील ॲड. प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित दीपक बडगुजर याच्यासह सात संशयितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता हा मोक्का जवळपास हटल्याने नाशिक पोलीस आयुक्तालयास मोठे अपयश आल्याचे दिसते आहे. आता शहर पोलिसांना या मोक्का संदर्भात मुंबई उच्च न्यायालयातून सुरु असलेली कार्यवाही थांबवावी लागण्याची शक्यता आहे. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी सिडकोतील उपेंद्रनगर येथे ॲड. जाधव यांच्यावर रात्री गोळीबार झाला होता. तब्बल दोन वर्षांनी म्हणजेच सन २०२४ मध्ये या गुन्ह्याची उकल झाली. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) सहा संशयितांना (Suspected) अटक केली.

शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी या गुन्ह्याचा तपास करून संशयित टोळीबाबत ‘मोक्का’चा प्रस्ताव तयार केला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन टोळीला ‘मोक्का’ लावला होता. यानंतर बडगुजर वगळता इतर संशयितांना मोक्कांतर्गत पुन्हा अटक करुन ‘स्पॉटसीन रिक्रिएशन’ करण्यात आले होते. त्यामुळे तपासाने महत्त्वपूर्ण गती प्राप्त केली होती. यासह बडगुजर याचा नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यातच आता राज्याच्या कायदा व सुव्यवस्था अप्पर महासंचालकांनी मोक्काचा अंतिम प्रस्ताव फेटाळला आहे. त्याबाबतचे पत्र पोलीस आयुक्तांना (Commissioner of Police) प्राप्त झाले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझा मुलगा दीपक आणि शिवसैनिक अंकुश शेवाळे यांच्यावर राजकीय सूडापोटी ‘मोक्का’ची बेकायदेशीर कारवाई करण्यात आल्याचा आरोप सुधाकर बङ्गुजर यांनी तेव्हा केला होता. दोघांना केवळ राजकीय दबावातून या प्रकरणात गोवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

मोक्कातील संशयित

त्यामध्ये मयूर चमन बेद (वय ३७, रा. फर्नांडिसवाडी, जय भवानीरोड, नाशिकरोड), बारक्या उर्फ श्रीकांत माणिक वाकुडे (३२), टाक्या उर्फ सनी रावसाहेब पगारे (३१, दोघे रा. जेतवननगर, जय भवानीरोड, नाशिकरोड), आकाश आनंद सूर्यतळ (२४, नांदूर गाव), परिणय उर्फ अंकुश लक्ष्मण शेवाळे (२९, लक्ष्मी चौक, सिडको), दीपक सुधाकर बडगुजर (सावतानगर, सिडको) यांचा समावेश होता. तर यापूर्वीही बेद टोळीवर ‘मोक्का’ आहे.

राजकीय द्वेषापोटी काही लोकांमार्फत प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणला गेला व कारवाई प्रस्तावित करण्यात आली. मात्र, राज्य पोलीस प्रशासनाने योग्य तपास करून न्याय दिला, आभारी आहे.

सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...