Friday, March 28, 2025
HomeUncategorizedमी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.. म्हणतोय हळव्या प्रेमाचा.. ‘रॉम कॉम’

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.. म्हणतोय हळव्या प्रेमाचा.. ‘रॉम कॉम’

गेले काही दिवस मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हे वाक्य चांगलंच गाजतंय. कधी राजकीय वर्तुळात तर कधी नेटकऱ्यांच्या पोस्टमध्ये.. महिनाभर चांगलंच गाजलेलं हे वाक्य आता पुन्हा ऐकू येतंय.. पण, ते मराठी चित्रपटसृष्टीतून.. कारण हळव्या प्रेमाची गोष्ट सांगणारा रॉम कॉम हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे.

प्रेक्षकांच्या आग्रहास्तव निर्मात्यांनी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करायचं निश्चित केलं आहे. नात्याची हळुवार कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एक मुलगा आणि मुलगी यांच्यात फुलत जाणारं प्रेमाचं नातं अशी या चित्रपटाची हलकी फुलकी कथा आहे. रॉमकॉम या चित्रपटात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

- Advertisement -

ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट फिल्मस् यांनी रॉमकॉम या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन शिंदे चित्रपटाचे निर्माते, सुशील शर्मा सहनिर्माते आहेत.

संदीप बाळकृष्ण बांगर, सुनील दिगंबर वाळुंज फिल्म प्रस्तुत करणार आहेत. गोरख जोगदंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शिवांजन फिल्म्स हे डिस्ट्रिब्युटर्स आहेत.

चित्रपटात विजय गिते आणि मधुरा वैद्य या नव्या जोडीसह किशोर कदम, छाया कदम, अंतरा पाटील, श्वेता नाईक, स्वाती पानसरे, फकिरा वाघ,दिलीप वाघ,शोभा दांडगे, सिद्धेश्वरा, हरी कोकरे, शाम भालेराव आणि असित रेडीज अशी दमदार स्टारकास्ट आहे. राॅमकाॅम येत्या 27 डिसेंबरला पुन्हां एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालेला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rahuri : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना घटनेच्या निषेधार्थ राहुरीत कडकडीत...

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri राहुरी शहरात बुधवार दि. 26 मार्च रोजी दुपारच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली होती. या...