Thursday, May 23, 2024
Homeनाशिकभुजबळांनी पारख यांची घेतली भेट

भुजबळांनी पारख यांची घेतली भेट

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गजरा उद्योग समूहाचे संचालक हेमंत मदन पारीख यांचे अज्ञात व्यक्ती कडून अपहरण करण्यात आले होते. नाशिक पोलिसांच्या कारवाई नंतर त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली असून त्यांना त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले आहे. आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उद्योजक पारीख यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

- Advertisement -

यावेळी ना. भुजबळ यांनी पारीख यांच्या त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. यावेळी पोलीस यंत्रणेशी चर्चा करून पारीख यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्याचा सूचना केल्या. तसेच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी जरब निर्माण करून गुन्हेगारीचा बीमोड करावा असे आदेश त्यांनी दिले. तसेच पारीख कुटुंबीयांना योग्य ते संरक्षण देऊन गुन्हेगारांवर योग्य ती कठोर कारवाई केली जाईल असे आश्वस्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या