Friday, July 10, 2026
HomeनाशिकNashik News : विरोधकांना आता जनताच घरचा रस्ता दाखवेल - मंत्री भुसे

Nashik News : विरोधकांना आता जनताच घरचा रस्ता दाखवेल – मंत्री भुसे

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri 

इगतपुरी नगरपरिषदेवर (Igatpuri Nagar Parishad) गेल्या तीस वर्षांपासून विरोधकांची एकहाती सत्ता असतांना देखील शहराचा विकास झालेला नाही. शहरात कुठल्याही प्रकारची नागरी सुविधा उपलब्ध नसुन विकासकामे होत नसल्याने शहरातील जनता आता त्रस्त झाली असून आता जनताच विरोधकांना घरचा रस्ता दाखविल्या शिवाय राहणार नाही असा घणाघात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केला.

- Advertisement -

इगतपुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या (Igatpuri Nagarparishad) पार्श्वभूमीवर मंत्री दादा भुसे यांनी शिवेसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) या युती असलेल्या उमेदवारांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेच्या ( उबाठा गट) माजी नगरसेविका शोभा भराडे यांच्यासह अनेक पदाधिकांऱ्यांनी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थीतीत शिवसेनेत प्रवेश घेतला.

दरम्यान, याप्रसंगी माजी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार निर्मला गावित, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, जेष्ठनेते संदीप गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, माजी नगराध्यक्षा जनाबाई खातळे, माजी उपनगराध्यक्ष फिरोज पठाण, शिवसेनेचे युवानेते संजय खातळे, तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे, देवीदास जाधव, दत्तात्रय गुंजाळ, सतिष कर्पे, वसीम सैय्यद, अनिल गभाले, मंगेश शिरोळे, आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

पडसाद : त्र्यंबकची माळीण होऊ द्यायची नसेल तर…

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक त्र्यंबकेश्वर आणि आजूबाजूचा परिसर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीचा सामना करीत आहे. अलीकडेच आलेल्या...