Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : बांगलादेशी घुसखोरांचे समर्थन करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी स्वत:चा विचार करावा -...

Nashik News : बांगलादेशी घुसखोरांचे समर्थन करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी स्वत:चा विचार करावा – मंत्री भुसे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बांगलादेशी घुसखोरांवर (Bangladeshi Infiltrators) कारवाई हा जाती धर्मापलीकडचा विषय आहे. या कारवाईला (Action) विरोध करीत घुसखोरांचे समर्थन होऊ शकत नाही. घुसखोरांच्या समर्थनार्थ आंदोलन (Agitation) करणार्‍यांनी स्वत:चा विचार केला पाहिजे, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिला. मालेगाव येथील डीपी रोडसाठी भुसंपादन विषयावर चर्चा करण्यासाठी भुसे आज (सोमवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी बैठक झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला.

- Advertisement -

मालेगाव (Malegaon) येथे बांगलादेशींना आश्रय दिला जात असल्याचा आरोप करण्यात येत असून बनावट कागदपत्रांसंदर्भात गुन्हेही (Case) दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) मालेगाव दौर्‍यावर आले असता स्थानिक काही लोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांनी त्यांच्या येण्यावर आक्षेप घेत मालेगावची बदनामी होत असल्याचा आरोप केला होता. त्यावर विचारले असता भुसे यांनी घुसखोरी हा गंभीर विषय आहे. देशाच्या सूरक्षेशी संबंधित विषयाकडे जातीधर्माच्या नजरेतून बघणे अयोग्य आहे. घुसखोरी आणि त्याला समर्थन हा देशद्रोहाचाच प्रकार आहे. त्यामुळे या कारवाईला विरोध करणार्‍यांनी स्वत:चाच विचार केला पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.

मालेगावच्या भुसंपादनावर चर्चा

मालेगाव आणि मालेगाव कॅम्प येथील डीपी रोडची (DP Road) सुधारणा आणि आवश्यक त्या ठिकाणी करावयाच्या भुसंपादनावर जिल्हधिकारी कार्यालयात संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. काही ठिकाणी उद्भवत असलेल्या समस्यांवर मार्ग काढून रस्त्यांची कामे मार्गी लावण्यावर आमचा भर असल्याचे भुसे यावेळी म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...