Monday, April 20, 2026
HomeनाशिकNashik News : मंत्री भुसेंनी राऊतांविरोधात मानहानीचा दावा ठोकला अन् आता मागेही...

Nashik News : मंत्री भुसेंनी राऊतांविरोधात मानहानीचा दावा ठोकला अन् आता मागेही घेतला; नेमकं प्रकरण होतं तरी काय?

कोर्टात दोघेही हसत-हसत आले

मालेगाव | Malegaon

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गिरणा सहकारी साखर कारखान्याशी संबंधित १७८ कोटी रुपयांच्या शेअर्स घोटाळ्याचा आरोप सोशल मीडियावरून केला होता. त्यामुळे मंत्री भुसे (Dada Bhuse) यांनी खासदार राऊत यांच्याविरोधात मालेगाव न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीसाठी आज (शनिवारी) राऊत मालेगाव कोर्टात हजर झाले असता मंत्री भुसे देखील उपस्थित होते. यावेळी भुसेंनी आपण हा खटला मागे घेतला असल्याचे माध्यमांशी बोलतांना सांगितले.

- Advertisement -

यावेळी भुसे म्हणाले की, “खासदार राऊत यांनी एका व्यक्तीच्या सांगण्यावरून माझ्यावर १७८ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला होता. मात्र, त्यात कुठलेही तथ्ये नव्हते. आम्ही राऊत यांच्या हाताखाली काम केलं आहे. दादा भुसे काय करतो आणि काय करू शकतो हे त्यांना माहीत आहे. त्यांनी खातरजमा केली नाही. पण नंतर माहिती घेतल्यावर त्यांनी चूक दुरूस्त केली. आज राऊत यांनी याप्रकरणी कोर्टात (Court) दिलगिरी व्यक्त करत संबंधित शेतकर्‍यांची (Farmer) माफी मागितली. त्यामुळे हा खटला मागे घेत आहे”, असे त्यांनी म्हटले.

तर खासदार राऊत म्हणाले की,”गेल्या काही दिवसांपासून कोर्टात खटला चालू होता. दादा भुसे आणि आमच्यात तोडगा निघाला आहे. मी जे विधान केलं होतं, ते चुकीचं असल्याचे माझ्या पडताळणी नंतर लक्षात आलं. या प्रकरणाशी आमचा थेट संबंध नव्हता. अद्वैत हिरे यांनी जी माहिती दिली त्यामुळे आम्ही त्यात गुंतलो, आता आम्ही खटला मागे घेतला.आम्हाला दोघांना कोर्टाने पहिले. आता वादाचा विषय संपला आहे. ज्यांच्यामुळे हा विषय आला तेही दुसऱ्या पक्षात गेले आहेत. दादा भुसे आणि माझे मैत्रीचे संबंध कायम आहेत”, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, राऊत यांनी यापूर्वीच माध्यमांशी बोलताना ‘या प्रकरणाशी थेट संबंध नसल्याचे म्हटले होते. तसेच या खटल्यातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे कोर्टात सादर केली होती. त्यानंतर आज राऊत यांनी याप्रकरणी कोर्टात दिलगिरी व्यक्त केल्याने हे प्रकरण मिटले आहे. याआधी झालेल्या सुनावणीसाठी संजय राऊत कोर्टात हजर राहिले नव्हते. त्यामुळे कोर्टाने त्यांना १२ हजारांचा दंड ठोठावला होता. यानंतर आजच्या सुनावणीसाठी (Hearing) ते स्वतः हजर होते.

कोर्टात दोघेही हसत-हसत आले

आज मालेगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी खासदार संजय राऊत आणि मंत्री दादा भुसे दोघेही न्यायालयात उपस्थित होते. विशेष म्हणजे दोघेही न्यायालयात हसत-हसत एकाचवेळी पोहोचले अन् आत मध्ये शेजारीही बसले. याबाबतचा त्यांचा व्हिडीओही समोर आला असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला प्रतीकिलोला सर्वाधिक 130 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate)...