नाशिक | Nashik
नाशिक दौऱ्यावर असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज (शनिवार) शहरात सुरू असलेल्या रस्ते विकास आणि दुरुस्ती कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामांसह नव्याने उभारल्या जाणाऱ्या काँक्रीट रस्त्यांच्या दर्जाची तपासणी करत, सर्व यंत्रणांनी ‘ॲक्शन मोड’वर येत खड्डे (Potholes) तात्काळ बुजवावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले.
आजच्या पाहणी दौऱ्यादरम्यान मंत्री महाजन यांनी मखमलाबाद रस्ता, रासबिहारी लिंक रोड, हिरावाडी तसेच बळीमंदिर परिसरात सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामांची (Work) बारकाईने पाहणी केली. कामाचा दर्जा उत्तम राखण्यासोबतच हे रस्ते वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना (Officer) दिल्या.
तसेच नागरिकांच्या (Citizen) तक्रारींची गंभीर दखल घेत मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले की, खड्डे बुजविण्याच्या कामात हलगरजीपणा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. या पाहणी दौऱ्यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महत्त्वाचे मुद्दे
पाहणी केलेले परिसर: मखमलाबाद रस्ता, रासबिहारी लिंक रोड, हिरावाडी आणि बळीमंदिर परिसर.
मनपाला कडक निर्देश: शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामात कोणतीही दिरंगाई होता कामा नये.
ॲक्शन मोडवर काम करा: नागरिकांना खड्ड्यांमुळे होणारा त्रास थांबवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने आणि वेगाने कामे पूर्ण करावीत.




