Thursday, May 1, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित, पर्यावरणपूरक होण्यासाठी उपाययोजना करा - मंत्री...

Nashik News : सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित, पर्यावरणपूरक होण्यासाठी उपाययोजना करा – मंत्री महाजन

नाशिक | Nashik

आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी त्यांनी प्रशासनाला कामे पुरी करण्यासंदर्भात आदेश दिले.

- Advertisement -

यावेळी मंत्री महाजन म्हणाले की,”अलिकडेच प्रयागराज येथे कुंभमेळा पार पडला. या कुंभमेळ्यात भाविक मोठ्या संख्येने गेले होते. या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा सुरक्षित, पर्यावरणपूरक होण्यासाठी उपाययोजना आतापासूनच उपाययोजना कराव्यात. तसेच भाविकांसाठी कार्यान्वित करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची कामे वेळेत होतील याची दक्षता घ्यावी”, असे म्हटले.

तसेच नाशिक महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, पोलिस दल, सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन विविध सूचना केल्या. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

दरम्यान, यावेळी आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचक्के आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

कोपरगावातील घडाळ्याच्या दुकानातील चोरी प्रकरणी बिहारची गँग जेरबंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कोपरगाव शहरातील घडाळ्याच्या दुकानातील चोरी प्रकरणी (Kopargav Watch Shop Theft) बिहार (Bihar) राज्यातील गँगला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Police) अटक केली...