Thursday, September 24, 2026
HomeनाशिकGirish Mahajan : दुष्काळ पाहणी दौरा थांबवून मदतीला धावले मंत्री महाजन; अपघातग्रस्त...

Girish Mahajan : दुष्काळ पाहणी दौरा थांबवून मदतीला धावले मंत्री महाजन; अपघातग्रस्त ट्रकमधून जखमींची केली सुटका

नाशिक | Nashik

पद, प्रोटोकॉल आणि ताफ्यापेक्षा संकटात सापडलेल्या माणसाचा जीव सर्वात महत्त्वाचा असतो, याचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यात (Nashik District) पुन्हा एकदा आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाहणी दौऱ्यावर असलेले पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी स्वतःचा ताफा थांबवून अपघातग्रस्त ट्रकमधील जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्ष बचावकार्यात सहभाग घेतला.

- Advertisement -

पिंपळगावजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील दुष्काळसदृश परिस्थितीची (Drought-Like Situation) पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांचा दौरा सुरू होता. निफाड तालुक्यातील पिंपळगाव परिसरात एका ट्रकचे अचानक टायर फुटल्याने तो नियंत्रणाबाहेर गेला आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकवर जोरदार आदळला.या भीषण अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर होऊन चालक आणि क्लिनरसह काही जण आत अडकून पडले होते.

प्रोटोकॉल बाजूला; स्वतः ट्रकवर चढून बचावकार्य

पालकमंत्र्यांचा ताफा घटनास्थळावरून जात असताना अपघाताचे गांभीर्य लक्षात येताच महाजन यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी थांबवली. केवळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन न थांबता ते स्वतः अपघातग्रस्त ट्रकच्या केबिनवर चढले आणि अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागले. त्यांच्यासोबत आमदार गोकुळ गीते, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच उपस्थित अधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनीही तातडीने बचावकार्यात हातभार लावला.

सरकारी वाहनातून जखमींना रुग्णालयात हलवले

जखमींना (Injured) बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी पालकमंत्र्यांनी शासकीय ताफ्यातील वाहनांचा वापर करत जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. तसेच उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना अपघातस्थळी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

यापूर्वीही केली होती अशीच मदत

संकटाच्या प्रसंगी ताफा थांबवून नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याची महाजन यांची ही पहिलीच वेळ नाही.१३ सप्टेंबर (मुलुंड ब्रिज दुर्घटना): मुलुंड ब्रिजजवळ ट्रक उलटून झालेल्या अपघातादरम्यानही त्यांनी ताफा थांबवून जखमींची विचारपूस केली होती व वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते.रस्त्यावर अचानक प्रकृती बिघडलेल्या एका महिलेला मदत करण्यासाठी त्यांनी आपला ताफा थांबवून वैद्यकीय मदत पुरवली होती.शासकीय प्रोटोकॉल आणि प्रशासकीय दौऱ्यांपेक्षा संकटात सापडलेल्या नागरिकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : संकटाच्या काळात बांधावर पोहोचा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे अधिकार्‍यांना...

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik पावसातील खंडामुळे निर्माण झालेली पीक परिस्थिती, पीक विमा, वीजपुरवठा आणि शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून, ङ्गशेतकरी प्रथमम या...