Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : डॉ. लहवितकर महाराजांचे जीवनकार्य समाजसुधारणेचा दीपस्तंभ - मंत्री गिरीश...

Nashik News : डॉ. लहवितकर महाराजांचे जीवनकार्य समाजसुधारणेचा दीपस्तंभ – मंत्री गिरीश महाजन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जगद्गुरू, द्वाराचार्य, विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांचे कार्य हे केवळ अध्यात्मापुरते मर्यादित नसून समाजसुधारणा, माणुसकी आणि राष्ट्रनिर्मितीचा दीपस्तंभ आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले. श्री क्षेत्र लहवित (ता.नाशिक) येथे आयोजित डॉ. लहवितकर महाराज यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. हा अमृतमहोत्सव सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता समाजप्रबोधनाचा व्यापक मंच ठरला. संत परंपरा, कीर्तन, प्रवचन आणि सामाजिक संदेश यांच्या माध्यमातून महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला. हजारो भाविकांसह राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली.

- Advertisement -

ना. महाजन म्हणाले, डॉ. लहवितकर यांनी अध्यात्माला केवळ पूजा-पाठापुरते मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक जाणिवेची आणि राष्ट्रहिताची दिशा दिली. शिक्षण, आरोग्य, सामाजिक समता, व्यसनमुक्ती आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांवर आधारित त्यांचे कार्य सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा संतविभूतींचे विचार हे केवळ एका काळापुरते नसून पिढ्यान्‌पिढ्या समाजाला योग्य मार्ग दाखवणारे ठरतात.

YouTube video player

ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, संत परंपरेतून समाजाला दिशा देण्याचे काम लहवितकर महाराजांनी केले. त्यांनी कधीही जात, पंथ, पक्ष यांची भिंत उभी केली नाही. सर्वसामान्य माणूस हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. आज समाजात वाढत चाललेली असहिष्णुता, ताणतणाव आणि नैराश्य पाहता महाराजांचे विचार अधिकच समर्पक व मार्गदर्शक ठरतात. मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, लहवितकर महाराजांनी अध्यात्माच्या माध्यमातून माणसामध्ये माणुसकी जागवण्याचे मोठे कार्य केले. सेवाभाव, नैतिकता, सामाजिक जबाबदारी आणि संस्कार यांचा त्यांनी आयुष्यभर आग्रह धरल्याचे सांगितले.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) म्हणाले, लहवितकर महाराजांचे कार्य हे अध्यात्म, शिक्षण आणि आरोग्य या तिन्ही क्षेत्रांना दिशा देणारे आहे. युवकांमध्ये मूल्याधिष्ठित विचार, सामाजिक जाणीव आणि सेवाभाव निर्माण करण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. आजच्या स्पर्धात्मक युगात यशाबरोबरच माणुसकी जपण्याचा संदेश महाराजांच्या कार्यातून मिळतो. या सोहळ्यास खासदार राजाभाऊ वाजे, भास्करराव भगरे, आमदार सरोज अहिरे, राहुल ढिकले, डॉ. किरण लाहामटे, हिरामण खोसकर, माजी खासदार हेमंत गोडसे, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, माजी आमदार बाळासाहेब सानप, अनिल आहेर, शिवराम झोले, वैभव पिचड आदींसह अनेक राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, प्रास्ताविक रामकृष्ण महाराज लहवितकर ट्रस्टचे अध्यक्ष गंगाधर जाधव यांनी केले. सूत्रसंचालन विवेक महाराज केदार यांनी तर आभार शिवा महाराज आडके यांनी मानले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली तुपे, राहुल महाराज गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले. ट्रस्टचे पदाधिकारी, सेवेकरी, स्वयंसेवक तसेच लहवित व पंचक्रोशीमधील ग्रामस्थ व भाविकांच्या सामूहिक योगदानामुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे शुभेच्छा संदेश

सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशांमध्ये लहवितकर महाराजांच्या अध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रसेवात्मक कार्याचे विशेष कौतुक केले. या संदेशाचे निलेश गाढवे पाटील यांनी वाचन करून दाखविले.

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

0
सटाणा | प्रतिनिधी Satana साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली...