Saturday, October 3, 2026
HomeनाशिकNashik News : आमदार राहुल ढिकलेंच्या पत्नीचे निधन; CM फडणवीसांनी घेतले पार्थिवाचे...

Nashik News : आमदार राहुल ढिकलेंच्या पत्नीचे निधन; CM फडणवीसांनी घेतले पार्थिवाचे अंत्यदर्शन

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

भाजपचे नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल ढिकले (MLA Rahul Dhikale) यांच्या पत्नी आदिती ढिकले (वय ४०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (शनिवारी) सकाळी निधन झाले आहे.अदिती ढिकले यांच्यावर सायंकाळी ५.३० वाजता गणेशवाडी येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

काल (शुक्रवार) सायंकाळी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ एका खाजगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे आमदार राहुल ढिकले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका शासकीय कार्यक्रमानिमित्त त्र्यंबकेश्वरच्या दौऱ्यावर (Trimbakeshwar Tour) आले होते. त्यांना या दु:खद घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपले नाशिकमधील पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ढिकले यांच्या नागचौकातील निवासस्थानी धाव घेत आदिती ढिकले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी विविध राजकीय पक्षाचे आमदार, तसेच नेते मंडळी व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...