Wednesday, August 19, 2026
Homeमुख्य बातम्याNashik Onion Issue News : कवडीमोल भावात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना किलोमागे १५...

Nashik Onion Issue News : कवडीमोल भावात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना किलोमागे १५ ते २० रुपये अनुदान द्या – आमदार रोहित पवारांची मागणी

नाशिक | Nashik

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला (Onion Farmer) अत्यंत कमी दर मिळत असल्याने प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचा उत्पादन खर्चही वसूल झालेला नाही. अनेक शेतकऱ्यांना तर कवडीमोल भावात कांदा विकल्यानंतर त्यातून वाहतूक भाडेही न निघाल्याने ते खिशातून देण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत कांद्याला भाव देण्याच्या मागणीसाठी राज्यातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढून आणि रस्त्यावर ठिय्या देत कांदा-भाकर खाऊन आंदोलन करत सरकारचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले.

- Advertisement -

कांद्याचा (Onion) उत्पादन खर्च किलोमागे १७ ते २० रुपये असताना खरेदीचा भाव साडेबारा रुपये असेल, तर हा शेतकऱ्यांवर घोर अन्याय आहे. त्यामुळे सरकारने नाफेडऐवजी २५ रु. किलोप्रमाणे बाजार समितीतच शेतकऱ्यांकडील सर्व कांद्याची खरेदी करावी आणि यापूर्वी मातीमोल भावात कांदा विकण्यात आलेल्या शेतकऱ्यांना किलोमागे १५ ते २० रुपये अनुदान देण्याची मागणी (Demand) आमदार रोहित पवारांनी केली. तसेच राज्यातील शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश बघता सरकार यावर तातडीने निर्णय घेईल, ही अपेक्षा. अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन उभारलं जाईल, याची सरकारने नोंद घ्यावी. असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी खासदार भास्कर भगरे, खासदार निलेश लंके, माजी आमदार सुनील भुसारा, माणिकराव शिंदे, डॉ. गुंजाळ, लासलगाव बाजार समिती उपसभापती संदीप पुंडलिक दरेकर, संचालक जयदत्त होळकर, सोनिया सत्यजीत होळकर, छबुराव जाधव, राजेंद्र बोरगुडे, शिवाजी बंडू सुरशे, नरेंद्र वाढवणे यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख (ग्रामीण) नितीन आहेर, निफाड पूर्व तालुका प्रमुख शिवा सुराशे, निफाड तालुका प्रमुख विक्रम रधवे, संतोष पानगव्हाणे, सद्दाम शेख, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते गुणवंत होळकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. विकास चांदर यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतून 6380 क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू

0
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेले भंडारदरा आणि निळवंडे धरण तुडूंब असून रतनवाडी आणि घाटघरमध्ये श्रावणसरींचा जोर वाढल्याने निळवंडे धरणातून 6380 क्युसेकने...