Tuesday, May 28, 2024
Homeनाशिकभाजप मनसेनेला नाशकात खिंडार

भाजप मनसेनेला नाशकात खिंडार

पंचवटी | वार्ताहर

भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी (दि.२६) शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.

- Advertisement -

राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहरात करत असलेले सामाजिक कार्य व नागरिकांचे सोडवीत असलेले प्रश्न आणि यातून सर्व पक्षातील तरुण पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आकर्षित होत आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनराव भुजबळ यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून जनतेच्या हिताकरिता घेत असलेल्या निर्णयामुळे संपूर्ण युवा वर्ग राष्ट्रवादीकडे आकर्षित होत आहे.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात रोज आढावा बैठक घेत असून या बैठकांमुळे जनता कर्फ्यू न करता सर्वात जास्त कोरोना मुक्त रुग्ण नाशिक जिल्ह्यात होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीप्रति निष्ठा व पक्षसंघटनेसाठी काम करण्याची उत्सुकता बघता या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगनराव भुजबळ व युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांचे आचार-विचार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची ध्येयधोरणे तसेच शासकीय योजनांचा लाभ युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या पोहचवून पक्षात भरीव कार्य करून पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी सदैव तत्पर राहील अशी ग्वाही यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी दिली.

प्रवेश घेतलेल्या या कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अधिक बळकटी प्राप्त होणार असून नाशिककरांचे प्रश्न सोडवण्यासाठी या पुढे देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेस कायम अग्रेसर राहील असे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या भावी राजकीय कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी अथर्व खांदवे, वैभव शिरसाठ, सागर शेजवळ, दीपक कुलकर्णी, अभिमन्य गुडघे-पाटील, ओमकार गोंद्रे, मयूर डोंगरे, गणेश गरगटे, प्रणव पानकर, संदीप दरेकर, शाहूराजे गुडघे,नितीन ओगदे, अमोल पाटील, वेदांत काळे, निरज पाटील, तुळशीदास गुडघे, सिद्धार्थ सांगळे, रोहित सूर्यवंशी, प्रशांत गाडेकर, उत्कर्ष डोके, उमेश स्नेहभक्त,

बलराम चव्हाण, सागर वाघ, विवेक तुपे, स्वप्निल सांगळे, तेजस काके, अतुल अर्जुन, स्वामी मोरे, प्रवीण कापुरे, शुभम खैरनार, गौरव भडांगे, नवनाथ सूर्यवंशी, शुभम शिरसाठ, अक्षय श्रीखंडे, हेमंत मोरे, आदित्य शिंदे, विशाल भडांगे, साहिल तुपे, अजय भसरे, रोहन घोडके, निनाद भडांगे, बाबू मठ्ठी, स्वप्निल मुठाळ, विकी गायकवाड आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी शहर उपाध्यक्ष किरण पानकर, निलेश सानप, मध्य विधानसभा अध्यक्ष जय कोतवाल, सिडको विभाग अध्यक्ष मुकेश शेवाळे, पूर्व विभाग अध्यक्ष सागर बेदरकर, राहुल कमानकर, करण आरोटे, रामेश्वर साबळे आदि उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या