Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik News : मराठी महिलेला देत होता त्रास; मनसे पदाधिकाऱ्यांनी केली परप्रांतीयाची...

Nashik News : मराठी महिलेला देत होता त्रास; मनसे पदाधिकाऱ्यांनी केली परप्रांतीयाची धुलाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील पंचवटीतील (Panchvati) दिंडोरी नाका परिसरातील (Dindori Naka Area) रूपश्री अपार्टमेंटमध्ये फ्लॅट रिकामा करण्यासाठी एका मराठी महिलेवर (Woman) दबाव टाकणार्‍या परप्रांतीय व्यक्तीस मनसेच्या पदाधिकार्‍यांकडून चांगलाच चोप दिल्याची घटना समोर आली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, या अपार्टमेंटमध्ये एकूण २८ फ्लॅट असून, त्यापैकी प्रमोद त्रिपाठी (Pramod Tripathi) या परप्रांतीय व्यक्तीचे सुमारे सात फ्लॅट आहेत. त्रिपाठीच्या घरासमोर राहणाऱ्या मराठी महिलेचा फ्लॅट देखील त्रिपाठीला स्वतःकडे घ्यायचा होता, यासाठी तो वारंवार त्या मराठी महिलेवर दबाव टाकत होता. मात्र महिलेने नकार दिल्यावर त्रिपाठीने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तो घरासमोर अश्लील चाळे करायचा तर कधी गांजा व इतर व्यसनांचे प्रदर्शन करून त्या महिलेचा मानसिक छळ करू लागला. यामुळे पीडितेने मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

YouTube video player

दरम्यान, पंचवटी विभागप्रमुख योगेश दाभाडे (Yogesh Dabhade) यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांसह बुधवार (दि.१३) रोजी त्रिपाठीकडे जाऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने मनसे पदाधिकाऱ्यांशी (MNS office Bearers) वाईट प्रकारे वर्तन करत अरेरावीची भाषा वापरली. यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्याला प्रत्यक्ष धडा शिकवला. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी (Citizen) मनसेच्या भूमिकेचे स्वागत केले असून, पीडित महिलेलाही दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...