Saturday, September 26, 2026
HomeनाशिकNashik MNS News : शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;...

Nashik MNS News : शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज (बुधवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector Office) तीव्र निदर्शने करण्यात आली. दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रशासनाने केलेल्या बळाच्या वापराचा निषेध नोंदवत मनसैनिकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी काही काळ ‘रस्ता रोको’ आंदोलनही केले.

- Advertisement -

देश हुकूमशाहीकडे वाटचाल करतोय

आंदोलनादरम्यान मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांनी विद्यार्थ्यांवर (Student) झालेल्या लाठीचार्जचा अत्यंत तीव्र शब्दांत निषेध केला. “देशाचे भविष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे हा लोकशाही आणि संविधानाचा थेट अपमान आहे. अशा प्रकारच्या घटनांवरून देश हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट दिसते,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली. तसेच जंतर-मंतरवर न्याय्य मागण्यांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाम आणि पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी

मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार आणि शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनीही प्रशासनाच्या दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवला. NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून यातील मुख्य दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली.

ताज्या बातम्या

Nashik News : दुष्काळसदृश परिस्थितीतील शेतकऱ्यांना विविध सवलतींचा लाभ देण्यासाठी यंत्रणेने...

0
नाशिक | Nashik खरीप हंगाम-२०२६ मध्ये पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १० तालुक्यांत प्रथम कळ (Trigger-1) लागू करण्यात आला आहे....