नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
येथील जयभवानी रोड, नाशिकरोड (Nashik Raod) येथे एका मुजोर परप्रांतीयाने एका स्थानिक रहिवासी लासूरे नावाच्या मराठी कुटुंबाला (Marathi Family) दादागिरी करून शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या मनसैनिकांनी (MNS Workers) त्या परप्रांतीयाला चांगलाच चोप दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित परप्रांतीय चार चाकी शिकताना लासुरे कुटुंबाच्या प्लेजर गाडीवर धडकला व गाडीचे नुकसान (Damge) केले. यानंतर लासुरे कुटुंबाने जाब विचारल्यावर या परप्रांतीयाने (Migrant) लासुरे कुटुंबाला शिवीगाळ करत “तुम मराठी लोग तुम्हारे औकात मे रहो, तुम्हारी गाडी भंगार है और तुम्हारा घर भी भंगार है” असं बोलू लागला.
त्यानंतर जयभवानीरोड (Jay Bhavani Road) येथील स्थानिक मनसेचे पदाधिकारी यांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी या परप्रांतीयाला समज दिली. परंतु, या मुजोर परप्रांतीयाने उर्मटपणे उत्तर दिले कि “मला मराठी येत नाही व मी हिंदीत बोलणार तुम्ही माझ्याशी हिंदीत बोला”, हे ऐकून मनसैनिकांनी परप्रांतीयाला चोप दिला व मराठी कुटुंबाची माफी मागण्यास सांगितले.





