नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील रामकुंड पंचवटी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (Maharashtra Navnirman Sena) गोदावरी नदी (Godavari River) प्रदूषण मुक्त व्हावे, याकरिता साधूसंतासह प्रशासनाविरोधात रामकुंडात (Ramkund) उतरून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नाशिककर देखील सहभागी झाले होते, त्यामुळे हे आंदोलन विशेषतः यशस्वी झाले.
यावेळी गोदावरी नदीचे पाणी पिण्या योग्य होत नाही तोपर्यंत आंदोलन याच प्रकारे सुरू राहणार असल्याचा इशारा मनसेच्यावतीने प्रशासनाला देण्यात आला. तर यापुढे नाशिक शहरातील प्रत्येक नदीतील पाणी हे पिण्यासाठी देण्यात येईल व प्रदूषण यूक्त पाण्याने अंघोळ घालण्यात येईल. तसेच शहरातील (City) नद्या लवकरात लवकर प्रदूषण मुक्त व्हाव्यात, असेही मनसेच्या वतीने सांगण्यात आले.
तसेच २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या (Kumbhmela) आत सर्व नद्या प्रदूषण मुक्त व्हाव्यात व प्रशासनाने शहरातील नद्या या कुंभमेळ्या पुरत्याच स्वच्छ न करता त्या कायमस्वरूपी स्वच्छ राहावे यासाठी योग्य ते नियोजन करावे अन्यथा प्रशासनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक प्रत्येक आंदोलनाला व विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल, अशा इशाराही यावेळी दिला गेला. याप्रसंगी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, प्रसाद सानप यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.