Thursday, April 17, 2025
HomeनाशिकNashik News : धावत्या रेल्वेत काढता येणार एटीएममधून रोकड; देशात पहिला प्रयोग...

Nashik News : धावत्या रेल्वेत काढता येणार एटीएममधून रोकड; देशात पहिला प्रयोग पंचवटी एक्स्प्रेसमध्ये

प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रेल्वे प्रवासादरम्यान रोकडची चणचण भासल्यास धावत्या एक्स्प्रेसमध्ये एटीएमची (ATM) व्यवस्था करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. याची सुरुवात पंचवटी एक्स्प्रेसपासून (Panchavati Express) करण्यात येणार असून हा देशातील पहिला प्रयोग असल्याची माहिती रेल्वेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.

- Advertisement -

मनमाड शहरात (Manmad City) असलेल्या रेल्वे वर्कशॉपमध्ये पंचवटी एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात एटीएम बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच प्रवाशांना पंचवटी एक्स्प्रेसमध्ये एटीएम सुविधा मिळणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर रेल्वेतदेखील प्रवाशांना एटीएम सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रवासादरम्यान (Journey) प्रवासी मोजके पैसे घेऊन बाहेर पडतो. त्यामुळे अनेक वेळा त्याला जास्त रोकडची गरज भासल्यास त्याला ट्रेनमधून उतरून प्लॅटफॉर्म किंवा स्टेशनच्या बाहेर जाऊन एटीएममधून पैसे काढण्याची वेळ येते. अनेक वेळा गाडीदेखील सोडावी लागते. प्रवाशांची ही अडचणवजा गरज लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने धावत्या ट्रेनमध्ये एटीएम बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांना (Passengers) धावत्या गाडीत एटीएमची सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्व प्रथम मनमाड-मुंबई दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात टप्प्या टप्प्याने इतर गाड्या मध्ये विशेषता लांब पल्ल्याच्या गाड्यात प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्याच्या घेतलेल्या या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले.

दरम्यान, प्रवाशांना सर्व सोयी सुविधा मिळाव्या यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे वेळोवेळी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात सध्या अमृत भारत योजने अंतर्गत देशभरातील अनेक रेल्वेस्थानकाचा कायापालट केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रवाशांना चांगली सुविधा (Facilities) देण्यासाठी धावत्या गाडीत एटीएम बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अशी झाली प्रगती

भारतात रेल्वेची सुरुवात १६ एप्रिल १८५३ साली झाली. याच दिवशी मुंबई ते ठाणे (Mumbai to Thane) दरम्यान पहिली रेल्वे धावली होती. त्यानंतर काही वर्षांनी मुंबई-भुसावळदरम्यान रेल्वे सुरू झाली. कालांतराने रेल्वे पुढे-पुढे सरकत गेली आणि तिचे जाळे संपूर्ण देशभरात पसरले. भारतात सुमारे १० हजारपेक्षा जास्त छोटे-मोठे रेल्वेस्थानक आहे. प्रारंभी रेल्वे डब्यात शौचालयदेखील नव्हते. १९०९ मध्ये शौचालय असलेले डबे तयार करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रेल्वेची प्रगती होऊन आज धावत्या गाडीत प्रवशाला एटीएमद्वारे पैसे काढता येणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : त्र्यंबकमध्ये सहाशे रुपयांची दर्शन तिकिटे दोन हजारांना विकली

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) दर्शनासाठी जास्त पैसे घेऊन खोटे पास विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहाशे रुपये किमतीचे दर्शन तिकिटे...