नाशिक | Nashik
आगामी कुंभमेळा (Kumbh Mela) यशस्वी व्हावा त्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) सातत्याने दिल्ली (Delhi) दरबारी विविध मंत्रालय पाठपुरावा करत आहेत. दरम्यान, सोमवारी (दि.१६ डिसेंबर) रोजी संसदेच्या अधिवेशनात खासदार राजाभाऊ वाजे यांनी कुंभमेळा नियोजनाच्या अनुषंगाने नाशिक शहरासह जिल्ह्यात प्रलंबित असलेले विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प, रेल्वे, रस्ते आदींच्या बाबत प्रश्न उपस्थित केला.
आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहर आणि जिल्ह्यातील (Nashik City and District) रस्ते, उड्डाणपूल, रेल्वे, बस स्थानक आदींची सुधारणा किंवा नूतनीकरण होणे गरजेचे आहे. तसेच, नव्याने काही पायाभूत प्रकल्प जसे की नाशिकरोड ते द्वारका उड्डाणपूल, आऊटर रिंग रोड आदींची उभारणी गरजेची असल्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेतील (Parliament) आपल्या भाषणात म्हटले आहे.
त्याबरोबरच नदी प्रदूषण, आरोग्य व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी सुविधांचा सहभाग या कुंभमेळ्याच्या दृष्टीकोनातून होणाऱ्या विकासाच्या (Development) माध्यमातून होणाऱ्या विकासात प्रामुख्याने असावा, असे देखील खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपल्या भाषणात (Speech) म्हटले आहे.