Wednesday, May 20, 2026
Homeमुख्य बातम्याMP Shrikant Shinde : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी कामाला...

MP Shrikant Shinde : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे – खासदार शिंदे

'शिवसंवाद दौऱ्याचा' नाशिकमधून प्रारंभ

नाशिक | Nashik

शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेला अधिक बळकट करण्यासाठी आणि शिवसैनिकांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘शिवसंवाद दौऱ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात आज (सोमवारी) खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या उपस्थितीत नाशिक नगरीतून अत्यंत उत्साहात झाली. या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी इगतपुरी आणि देवळाली विधानसभा मतदारसंघाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

- Advertisement -

यावेळी शिंदे म्हणाले की, “राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेनेला (Shivsena) मोठे यश मिळाले आहे. ज्या पद्धतीने पालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने भगवा फडकावला, त्याच पद्धतीने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही आपल्याला ऐतिहासिक विजय मिळवायचा आहे. त्यासाठी सर्व स्थानिक शिवसैनिकांनी आतापासूनच जोमाने कामाला लागावे,” असे आवाहन त्यांनी केले.

मतदारयादी मोहिमेत ‘युवासेना’ आणि ‘महिला आघाडी’वर मोठी जबाबदारी

पुढील महिन्यापासून राज्यभरात मतदारयाद्यांची ‘एसआयआर’ (SIR) मोहीम राबवली जाणार आहे. तत्पूर्वी सध्या मॅपिंग प्रक्रिया सुरू असून, शिवसेनेच्या माध्यमातून इगतपुरी आणि देवळाली विधानसभा मतदारसंघांत जवळपास सर्वच ठिकाणी ‘बीएलए’ (BLA – बूथ लेव्हल एजंट) यांची नियुक्ती पूर्ण झाली आहे. या मोहिमेत शिवसैनिकांनी स्वतःला झोकून देऊन काम करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. यामध्ये विशेषतः युवासेना आणि महिला आघाडीने पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या भागातील मतदारांची नावे तपासणे, अधिकृत मतदारांची नावे चुकून कट होणार नाहीत याची काळजी घेणे, बोगस नावे मतदारयादीतून बाद करणे आणि नवीन मतदारांची नावनोंदणी करून घेणे यांसारख्या तांत्रिक व महत्त्वाच्या कामांवर बारकाईने लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

पदाधिकाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा

या आढावा बैठकीदरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, स्थानिक प्रश्न आणि मागण्या जाणून घेतल्या. त्यावर सकारात्मक चर्चा करून संबंधित विषयांवर योग्य त्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.

कोणते नेते होते उपस्थित

याप्रसंगी राज्याचे मंत्री दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, आमदार सुहास कांदे, आमदार मनीषा कायंदे, नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते अजय गोरस्ते, विजय करंजकर, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, माजी खासदार आनंद परांजपे, उन्मेष पाटील, माजी आमदार नरेंद्र दराडे, काशिनाथ मेंगाळ, जिल्हा संघटक योगेश म्हस्के, युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अविष्कार भुसे, युवासेना जिल्हाप्रमुख सदानंद नवले यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : राष्ट्रवादीच्या महत्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यावर रोहित पवारांची पोस्ट...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शरद पवार आणि अजित पवार गटातील नेत्यांच्या गुप्त भेटीगाठींमुळे राजकीय वातावरण...