नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महापालिकेचे (Nashik NMC) शिक्षणाधिकारी (Education Officer) बी.टी.पाटील यांचा पदभार अखेर आयुक्त मनीषा खत्री यांनी सोमवारी (दि.१७) रोजी काढून घेतला. गोदा संवर्धन कक्षाचे उपायुक्त नितीन पवार यांच्याकडे सध्या प्रभारी कार्यभार देण्यात आला आहे. नवीन शिक्षणाधिकारी लवकरच नेमण्यात यावा अशी मागणीही मनपाकडून शासनाकडे करण्यात आली आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये एकतर्फी समायोजन केल्या प्रकरणात अनियमितता झाल्याचे मान्य करत या प्रकरणाची सध्या अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी (Pradeep Chaudhary) यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, या समितीला १५ दिवसात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात बी.टी.पाटील (B.T. Patil) यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विधिमंडळात नगरविकास मंत्र्यांच्या वतीने (दि.११ मार्च) रोजी दिले होते. याप्रकरणी शिक्षक आमदार किशोर दराडे (Kishor Darade) यांनी लक्षवेधी सादर केली होती.