Friday, May 29, 2026
HomeनाशिकNashik News : महिलांवरील अत्याचार रोखण्यात सरकार अपयशी; नराधमाला त्वरित फाशी द्या!...

Nashik News : महिलांवरील अत्याचार रोखण्यात सरकार अपयशी; नराधमाला त्वरित फाशी द्या! नाशिक शहर काँग्रेसची मागणी

सरकार बरखास्त करण्याची मागणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

महाराष्ट्रात अल्पवयीन मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या (Women Rape Case) घटनांनी राज्य हादरले असून, राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. अशा नराधमांवर वचक बसवण्यासाठी नसरापूर येथील प्रकरणातील आरोपीला त्वरित फाशी द्यावी, अशी आक्रमक मागणी नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी केली आहे. नसरापूर (Nasrapur) येथील अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्याकांडाच्या निषेधार्थ बुधवारी (दि.६) काँग्रेस (Congress) भवन येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधार्थ आणि गुन्हेगाराला फाशी देण्याच्या मागणीसाठी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

आंदोलनाप्रसंगी बोलताना छाजेड म्हणाले की, राज्यात निष्पाप लोकांचे बळी जात असताना दुसरीकडे सरकारमधील (Government) मंत्री आणि भाजप नेते निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष करण्यात दंग आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे. सत्तेतील मंत्र्यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते, मात्र हे सरकार अतिशय असंवेदनशील आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी हे सरकार सक्षम नसल्याने राज्यपालांनी (Governor) हे सरकार त्वरित बरखास्त करावे.

याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई, ज्येष्ठ उपाध्यक्ष संदीप शर्मा, अल्तमश शेख, जावेद इब्राहिम, गौरव सोनार, तनवीर तांबोळी, स्वाती जाधव, वनिता मुळाने, धोंडीराम बोडके, मुस्ताक कुरेशी, अण्णा मोरे, संतोष ठाकूर, स्वप्निल पाटील, गुड्डी खान, जुली डिसूजा, असलम पैलवान, फारुख मन्सुरी, शिवाजी गंभीरे, शैलेश मैंद, प्रकाश माळी, सुनील राजपूत, जावेद काझी, डॉक्टर सय्यद नदीम, इमरान शेख, जावेद शेख, सईद मणियार, प्रवीण शेख, अनिता सूर्यवंशी, अफरोज खान, श्रद्धा सूर्यवंशी, गोरख साळवे, आयान खान आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

0
ओझे | वार्ताहर Oze लखमापूर परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दहेगाव येथील एका दुचाकीस्वारावर बिबट्याने अचानक हल्ला करत जखमी...