Friday, September 11, 2026
HomeनाशिकNashik News : सारडा सर्कल परिसरातील अतिक्रमणांवर बुलडोझर; सिंहस्थपूर्वी मनपा-पोलिसांची संयुक्त धडक...

Nashik News : सारडा सर्कल परिसरातील अतिक्रमणांवर बुलडोझर; सिंहस्थपूर्वी मनपा-पोलिसांची संयुक्त धडक मोहीम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी नाशिक महापालिका आणि पोलिस प्रशासनाने (Nashik Municipal Corporation and Police Administration) आज (दि.०९) रोजी अतिक्रमणांविरोधात मोठी कारवाई करत ४० ते ५० पक्की दुकाने व टपऱ्यांवर बुलडोझर चालवून जमीनदोस्त करण्यात आले.

- Advertisement -

ही कारवाई आज पहाटेपासून प्रभाग क्रमांक १४ मधील सारडा सर्कल (Sarada Circle Area) ते हॉटेल चित्रकूट परिसरातील अनधिकृत दुकाने आणि टपऱ्यांवर करण्यात आली. पहाटे सहा वाजेपासून सुरू झालेल्या या मोहिमेत शेकडो अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.

नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) विकास आराखड्यातील ३० मीटर डी.पी. रस्त्यात बाधित होत असलेल्या बांधकामांवर ही कारवाई करण्यात आली. शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे, रस्ता रुंदीकरण आणि आगामी सिंहस्थासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ही धडक मोहीम हाती घेतली आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ सप्टेंबर २०२६ – विद्यार्थ्यांचा आक्रोश कोणी ऐकेल काय?

0
महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरासह संपूर्ण राज्यामध्ये आज स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीमुळे एक अभूतपूर्व आणि चिंताजनक जनक्षोभ उसळला आहे. नीट परीक्षेपासून सुरू...