नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक मनपाच्या (Nashik NMC) कर विभागाने (Tax Department) यंदा अपेक्षेपेक्षा चांगले काम करुन अडीचशे कोटींपेक्षा जास्त कर वसूल केला आहे. या वर्षी मनपाच्या वतीने नवीन मिळकतींचा शोध लावून त्यांचा देखील कर घेण्यात आला. तर मार्च एन्डनंतर मनपाकडून सुरु करण्यात आलेली करसवलत योजनेचा देखील चांगला फायदा मनपाला होतांना दिसत आहे.११ दिवसात तब्बल १२ कोटी रुपयांचा भरणा मनपाच्या कर विभागात झाला आहे.
मनपा प्रशासनाने ३० एप्रिल २०२५ पर्यंत एकूण देयक रक्कमेवर आठ टक्के व ऑनलाईन (Online) भरणा केल्यास दहा टक्के सूट जाहीर केली आहे. तर करदात्यांनी त्याचा लाभघ्यावा, असे आवाहन केले आहे. महापालिकेने मागील आर्थिक वर्षात २५८ कोटिंचा मालमत्ता कर वसूल करत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. त्यामध्ये सवलत व अभय योजना यांचे योगदान देखील मोठा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मनपा प्रशासनाने नियमित करदात्यांसाठी एप्रिल ते जून अशी तीन महिन्यांसाठी सवलत योजना लागू केली आहे. त्यात एप्रिल महिन्यात मालमत्ता कर अदा केल्यास मुळ देयक रक्कमेवर आठ टक्के सूट दिली जाणार आहे. तर नागरिकांनी (Citizen) ऑनलाईन भरणा केल्यास दहा टक्के सूट मिळते.
दरम्यान, मे महिन्यात सहा व जून महिन्यात तीन टक्के सूट मिळते. गतवेळी सवलत योजना मनपाला पावली होती. तीन महिन्यात तब्बल १२० कोटींचा भरणा नागरिकांनी करत आर्थिक सुट पदरात पाडली. यंदाही सवलत योजनेचा प्रारंभ दणक्यात झाला असून एप्रिलच्या ११ दिवसात साडेबारा कोटी कर जमा झाला. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता गतवर्षीचे रेकॉर्ड ब्रेक मालमत्ता कर वसूल होण्याची चिन्हे आहेत.
मनपा कर विभागाने नियमित करदात्यांसाठी सवलत योजना राबवली असून पहिल्या ११ दिवसात साडेबारा कोटी कर जमा झाला. नागरिकांनी कर अदा करुन योजनेचा लाभ घ्यावा.
अजित निकत, उपायुक्त, कर विभाग मनपा