Wednesday, June 10, 2026
HomeनाशिकNashik NMC News : महापालिकेची उद्या अंतिम प्रभाग रचना; नंतर महापौर सोडत...

Nashik NMC News : महापालिकेची उद्या अंतिम प्रभाग रचना; नंतर महापौर सोडत व प्रभाग आरक्षण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिका निवडणुकीची (Nashik NMC Election) अंतिम प्रभागरचना सोमवारी (दि.६) प्रसिद्ध होणार आहे. प्रारूप प्रभाग रचना (Ward Structure) प्रसिद्ध झाल्यावर ९१ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. त्यांची सुनावणी होऊन त्याचा अहवाल सुनावणी अधिकारी तथा राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी शासनाला सादर केला. आता सर्वांचे लक्ष अंतिम रचनेकडे लागले आहे.

- Advertisement -

अंतिम रचना जाहीर झाल्यावर महापालिका प्रशासनाकडून त्वरित महिला ओबीसींसह (OBC) इतर आरक्षणांची (Reservation) सोडत काढली जाणार आहे. यासाठी मुंबईनाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात नियोजन करण्यात येणार असल्याचे समजते. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना बोलावून चिठ्ठ्या काढल्या जाणार असल्याचे समजते. त्याचप्रमाणे मुंबईत शासनाच्या पहिल्या व दुसऱ्या टर्मसाठी आरक्षण सोडत देखील काढली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाकडून निवडणूक कामाला गती मिळाली आहे. ११ जूनपासून नाशिक महापालिका प्रशासन प्रभाग रचना तयार करण्याचे काम करत होते. मनपा प्रशासनाने ३१ प्रभागांची रचना केली आहे. २९ प्रभाग चार तर दोन प्रभाग तीन सदस्यीय आहेत.

दरम्यान, प्रत्यक्ष मतदानासाठी (Voting) ४००० ईव्हीएमची मागणी मनपाने केली आहे. सुमारे १८०० मतदान केंद्रांवर या यंत्रांचा वापर होईल. मतदानाची प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व वेगवान पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर काटेकोर व्यवस्थापन करण्यात येत आहे. मतदान प्रकियेसाठी ९,५०० पेक्षा जास्त कर्मचारी लागणार आहेत. यामध्ये शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी, महापालिकेच्या शाळांतील शिक्षक तसेच मान्यताप्राप्त खासगी शाळांतील शिक्षकांची मदत मनपा घेणार आहे.

दिवाळीनंतर निवडणूक?

प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर दिवाळीनंतर महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वपक्षीय नेते, माजी नगरसेवक व इच्छुक प्रभागात अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. त्याचप्रमाणे महायुती व महाविकास आघाडी होणार का, याकडेदेखील लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी गोकुळ गिते रवाना;...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) हे...