Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News: नाशिक महापालिकेची पाणीचोर शोधमोहिम रखडली; आयुक्तांच्या आदेशांची अंमलबजावणी नाही

Nashik News: नाशिक महापालिकेची पाणीचोर शोधमोहिम रखडली; आयुक्तांच्या आदेशांची अंमलबजावणी नाही

दोन महिन्यात केवळ ८ मोटारी जप्त,

नाशिक | प्रतिनिधी
पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नाशिक शहरातील अनधिकृत नळ तसेच मोटर कनेक्शन शोधून त्यावर कारवाईचे आदेश प्रशासनाला महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले होते. त्याबाबत मुख्यालयातून तसे आदेश विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते तर त्वरित कारवाई देखील सुरू झाली होती. मात्र, राजकीय दबावामुळे ही शोधमोहीम रखडली असून, गत दोन महिन्यांत नवीन नाशिक विभागातून फक्त ८ पाण्याच्या मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाणी गळती शोधमोहीम फक्त कागदावरच दिसत आहे.

जानेवारी २०२५ मध्ये ही शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, इकडे जाऊ नका, तो माझा कार्यकर्ता आहे, असे मनपा अधिकाऱ्यांना सांगत राजकीय लोकांनी दबाव टाकून कारवाई होऊ दिली. त्यामुळे गत दोन महिन्यांत महापालिकेने फक्त आठ मोटारी जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून, ज्या नळजोडणींना थेट मोटार लावून पाणी उपसले जात आहे, अशा मोटारी तत्काळ जप्त करा. तोट्या नसलेल्या नळजोडणींचा पुरवठा बंद करा, असे आदेश मनपा आयुक्त खत्री यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आयुक्तांनी मनपा विशेष बैठक घेत पाणीपुरवठा विभागाला आदेश दिले होते. पाण्याचा अपव्यय होत असल्याचे समोर येत आहे. हा अपव्यय आणि दुरुपयोग टाळला गेला पाहिजे. त्यासाठी विभागनिहाय करसंकलन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे संयुक्त पथक तयार करा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. ज्या नळजोडणींना थेट मोटार लावून पाणी उपसले जात आहे, अशा मोटारी तत्काळ जप्त करा.

- Advertisement -

हे ही वाचा : Nashik News: मनपाने ‘ती’ सांडपाणी निविदा रद्द करावी, अन्यथा थेट लक्षवेधी मांडणार; शिवसेना शिंदेगटाच्या आमदाराचे आयुक्तांना पत्र

तोट्या नसलेल्या नळजोडणींचा पुरवठा बंद करा. ज्या नळजोडणींना तोट्या बसवलेल्या नाहीत, अशा जोडणींचा पाणीपुरवठा खंडित करण्यात करा. पाणी बिलांचे वाटप करून नागरिकांकडून थकित पाणीपट्टीची वसुली करा. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करा. पाण्याच्या दुरुपयोग टाळण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना राबवा. दैनंदिन कारवाईचा अहवाल सादर करा, असे आदेशात म्हटले होते. मात्र, आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणीच होत नाही. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक महापालिकेच्या पाणी वापर आणि पुनर्वापर व्यवस्थापनावर टीका केली होती. त्यांनी महापालिकेने पाण्याचे लेखापरीक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले होते. मात्र, त्याकडे देखील दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

स्काडा मीटर
पाणी गळती रोखण्यासाठी महापालिकेने स्काडा मीटर तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे जलकुंभ ते नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचणाऱ्या पाण्याच्या थेंबांचा हिशेब ठेवता येईल, ज्यामुळे गळती नियंत्रणात मदत होईल. मात्र या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत अद्याप ठोस प्रगती झाल्याचे दिसत नाही. नाशिक शहरातील पाणी गळती रोखण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तथापि, अनेकदा या उपाययोजना केवळ कागदावरच राहिल्या आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...