Friday, May 1, 2026
HomeनाशिकNashik News: मतदानासाठी मनपाला लागणार 'इतक्या' हजरा ईव्हीएम मशीन; 'इतक्या' मनुष्यबळाची तयारी

Nashik News: मतदानासाठी मनपाला लागणार ‘इतक्या’ हजरा ईव्हीएम मशीन; ‘इतक्या’ मनुष्यबळाची तयारी

नाशिक | प्रतिनिधी
आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारीला गती दिली आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी मनपाला राखीव धरुन सुमारे चार हजार ईव्हीएम लागणार आहे. त्याची मागणी देखील करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

शासनाच्या आदेशानुसार २०१७ प्रमाणेच शहरातील ३१ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर करण्यात आली तर त्या रचनेवर आलेल्या एकूण ९१ हरकतींची सुनावणी पूर्ण झाली असून, आता ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. तर मतदानासाठी साडेनऊ हजार मनुष्यबळांची तयारी देखील मनपा प्रशासन करीत आहे. आगामी निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (इव्हीएम) वापर होणार आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष मतदानासाठी आणि बिघाड झाल्यास पर्यायी वापरासाठी मिळून ४००० ईव्हीएमची मागणी केली आहे. शहरभर पसरलेल्या सुमारे १८०० मतदान केंद्रांवर या यंत्रांचा वापर होईल. मतदानाची प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व वेगवान पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर काटेकोर व्यवस्था करण्यात येत आहे.

- Advertisement -

दुसरीकडे साडेनऊ हजार मनुष्यबळ सज्ज करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी, महापालिकेच्या शाळांतील शिक्षक तसेच मान्यताप्राप्त खासगी शाळांतील शिक्षकांचा समावेश असेल. प्रत्येक मतदान केंद्रावर सुरळीत प्रक्रिया चालावी, यासाठी या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिक्षकांना मिळणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे काही दिवस शैक्षणिक कामकाजावर परिणाम होऊ शकतो, मात्र लोकशाही प्रक्रियेसाठी त्यांचा सहभाग आवश्यक राहणार आहे. शहरात एकूण १८०० मतदान बुथ तयार करण्याचे नियोजन असून मतदान प्रक्रियेत शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस दलाबरोबरच अर्धसैनिक दलाचीही मदत घेण्यात येणार आहे.

गर्दीचे केंद्रे, संवेदनशील भाग व मोठ्या प्रभागांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवला जाईल, या जागांचा तपशील मनपा तयार करीत आहे. तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सोयीस्कर सुविधा मिळाव्यात यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली जाणार आहे. १३ ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभागरचना जाहीर होताच निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित होणार असून, त्यानंतर शहरातील राजकीय वातावरण अधिकच रंगणार आहे. याकडे देखील लक्ष लागून आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

मिसिंग

Mumbai-Pune Missing Link: मिसिंग नव्हे तर ‘कनेक्टिंग लिंक’, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई-पुणे...

0
पुणे | Puneमुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या आणि प्रवासाचा वेग वाढवणाऱ्या बहुप्रतिक्षीत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे आज दिमाखात लोकार्पण झाले. मुख्यमंत्री...