Thursday, January 8, 2026
Homeक्राईमNashik News : कारागृहाची वीज तोडली! देयके थकवल्याची नोटीस मिळताच तत्काळ ३०...

Nashik News : कारागृहाची वीज तोडली! देयके थकवल्याची नोटीस मिळताच तत्काळ ३० लाख रुपयांचा भरणा

नाशिक | भारत पगारे | Nashik

विविध घडामोडींमुळे नियमित चर्चेत राहणाऱ्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाला (Nashik Road Central Jail) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने चांगलाच दणका दिला. हा दणका मिळताच कारागृह प्रशासनाने वीज देयकांचा (Electricity Bills) तत्काळ भरणा केल्याने कारागृहातील पुढील वीजतोडणीचा मुहूर्त आता लांबला आहे. दरम्यान, बिल थकल्याने अखेर वीज वितरण कंपनीने कारागृहाच्या दर्शनी भागात असलेल्या कैद्यांनी निर्मित केलेल्या वस्तू विक्री केंद्राचाच वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे थेट कारागृहाचाही वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, याची धास्ती घेऊन ३० लाख ८६ हजार रुपयांचा थकित वीज भरणा प्रशासानाने नुकताच केल्याचे समजते.

- Advertisement -

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दैनंदिन काही ना काही घडामोडी घडतात. काही घडामोडी बाहेर येतात तर काही अंतर्गत पद्धतीने मिटवून घेतल्या जातात. असे अनेक गंभीर प्रकरणांतून समोर आले आहे. त्यातच मागील महिन्यात एका कैद्यावर सहकैद्यांनी अनन्वित अत्याचार केल्याचे उघड झाल्याने न्यायालयाच्या आदेशाने संबंधित बंदिवानांविरोधात नाशिकरोड पोलिसांत गुन्हा (Nashik Road Central Jail) दाखल झाला होता. अशातच कारागृह प्रशासनाने संपूर्ण ‘बार्ड’ व बॅरेक व विविध आस्थापनांचे मागील अडीच ते तीन महिन्यांच्या वीजबिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे नाशिकरोड येथील विद्युत भवनच्या संबंधित सर्कलप्रमुखांनी कारागृह प्रशासनाला थकित बीज देयके भरण्याची विनंती वजा नोटीस पाठवली होती. तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे संबंधित वीज वितरण अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून वीजबिलाचा भरणा न केल्यास वीजजोडणी खंडित केली जाईल, अशी सूचना वजा इशारा दिला होता.

YouTube video player

तरीसुद्धा कारागृहाने साफ दुर्लक्ष केल्याने अखेर वीज वितरण कंपनीने कारागृहातील दर्शनी भागात असलेल्या कैद्यांनी निर्मित केलेल्या विविध वस्तू विक्री केंद्राचा वीजपुरवठा खंडित केला. यानंतरही कारागृहाने दुर्लक्ष केल्याने गेले काही दिवस या केंद्रातील कामकाज ठप्प झाले होते व ते अंधारात होते. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याचा विचार सुरू करण्यात आला होता. त्यातच ही वीजजोडणी तोडल्याने कारागृह प्रशासन तणावात होते. बिलाचा भरणा केलाच नाही तर कारागृह, बॅरेक व यार्डमधील वीजपुरवठा खंडित होऊन विपरीत घडण्याची भीती असल्याने प्रशासनाची धास्ती वाढली होती. त्यामुळे कारागृहाने ‘वर ‘पर्यंत संपर्क साधला. यानंतर आवश्यक निधीची तरतूद झाल्याने तो बिलामार्फत वीज वितरण कंपनीस अदा करण्यात आल्याचे समजते.

खंडित वीजपुरवठा सुरळीत

कलाकुसर वस्तू विक्री केंद्र व मध्यवर्ती कारागृहाचे साधारणतः अडीच ते तीन महिन्यांचे ३० लाख ८६ हजार रुपयांचे बिल थकित होते. इशारा मिळूनही दुर्लक्ष केल्याने एका विभागाची जोडणी खंडित केली होती. त्यानंतर अखेर या सर्व थकित रकमेचा भरणा कारागृहाने केला असून आता चालू महिन्याचे रीडिंग सुरू झाले आहे. तर खंडित केलेला पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, असे समजते.

मुद्दे

  • भरणा झालाच नसता तर कारागृहातील वीज तोडण्याची होती तयारी
  • संबंधित विभागाकडून वेळेत खर्च व निधी न मिळाल्याने नामुष्की
  • यापुढे वीजबिले थकित राहणार नाही याची दक्षता घेणार?
  • वीज खंडित झाल्यानंतर काही घटना घडल्यास जबाबदार कोण?

ताज्या बातम्या

AMC Election : शिवसेनेचा गड की भाजप-राष्ट्रवादीची मुसंडी?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगरच्या मध्यवर्ती शहराचा भाग हा पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात शिवसेनेला सोबत घेऊनच यापूर्वी भाजपला काही प्रमाणात यश मिळाले होते....