नाशिकरोड | प्रतिनिधी
नाशिकरोड पोलिसांनी रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उचलला असून सुमारे ४० रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने भर रस्त्यावर रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, प्रवाशांसोबत उद्धट बोलणे, जादा भाडे आकारणे, फ्रंट शीट बसवणे, कागदपत्र न बाळगने, नियमाप्रमाणे दिलेला गणवेश न घालणे, प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर सुमारे ३० रिक्षावर दंडात्मक कारवाई केली. दोन रिक्षावर गुन्हे दाखल करण्यात आले, तर त्याचप्रमाणे त्यांच्याकडून पंधरा हजार दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला. तर कालबाह्य झालेल्या 8 रीक्षा जमा करून आरटीओच्या ताब्यात देण्यात आल्या .
या कारवाईत नाशिकरोड पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा