Wednesday, September 9, 2026
HomeनाशिकNashik News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रणधुमाळीला सुरूवात; जिल्हा परिषदेची प्रारूप प्रभागरचना...

Nashik News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रणधुमाळीला सुरूवात; जिल्हा परिषदेची प्रारूप प्रभागरचना जाहीर

इच्छुकांचा जीव टांगणीला, २१ जुलैपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यात तीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांना (Zilla Parishad and Panchayat Samiti Election) अखेर खऱ्या अर्थाने सुरुवात घाली असून, ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार काल सोमवारपासून (१४ जुलै) प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. हा आराखडा जिल्ह्यासाठी (District) १५ तहसील कार्यालये, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरीकरणामुळे अनेक तालुक्यांमध्ये (Taluka) गट-गणांच्या रचनांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्यामुळे इच्छुकांची स्थिती अनिश्चिततेत गेल्या निवडणुकीत (२०१७) च्या तुलनेत जिल्हा परिषदेसाठी ७३ गट होते ते आता ७४ गट व १४८ गण झाले आहेत. या फेरबदलामुळे जिल्ह्यांत १५ तालूक्यांत ३ गट वाढले तर ४ गट कमी झाले आहेत.प्रभागरचना आराखड्याचे कार्यक्रमपत्रिका व वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार १४ जुलै प्रारूप आराखडा (Plan) प्रसिद्ध करण्यात आला असून, दि.२१ जुलै हरकती व सूचना सादर करण्याची शेवटची तारीख राहणार आहे. दि. २८ जुलै जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर केला जाणार आहे. दि.११ ऑगस्ट विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी करण्यात येणार आहे. दि. १८ ऑगस्ट अंतिम प्रभाग रचना आयोगाकडे सादरीकरण करण्यात येणार आहे.

जिल्हातील लोकसंख्येचा आढावा

ग्रामीण लोकसंख्या : ३४ लाख ५८ हजार २३३
अनुसूचित जाती : २ लाख २९ हजार ६००
अनुसूचित जमाती : १३ लाख ७७ हजार ०६१
त्यानुसार गट व गणांचे आरक्षण निश्चित केले जाणार

तालुकानिहाय संख्या

तालुका गट गण
बागलाण १४
मालेगाव १६
देवळा
कळवण
सुरगाणा
पेठ
दिंडोरी १२
चांदवड १०
नांदगाव
येवला १०
निफाड १६
नाशिक
त्र्यंबकेश्वर
इगतपुरी १०
सिन्नर १२
एकूण ७४ १४८

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप पुरस्काराने गौरव

0
मुंबई | वृत्तसंस्था जगभरातील नेत्यांच्या आवाजाने दुमदुमलेल्या ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये आज ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. निमित्त होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...