नांदुरी | वार्ताहर | Nanduri
आद्यस्वयंभु, आदिमाया सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.
‘बोल आंबे की जय, सप्तशृंगी माता की जय…’ अशा जयघोषाने मंदिरसह गावातील परिसर दुमदुमला होता. अतिशय धार्मिक वातावरणात सप्तशृंगगडावर (Saptashrungigad) सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सव प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनाची रिघ बघायला मिळाली.
हे देखील वाचा : आदिमायेचा आजपासून जागर; सप्तशृंगीगडावर नवरात्रोत्सव, आज घटस्थापना
सकाळी ८ वाजता संस्थेच्या मुख्यकार्यालयात श्री भगवतीच्या आभूषणांचे पूजन विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. व्ही. वाघ यांनी केले. त्यानंतर श्री भगवतीच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक संपुर्ण गावातुन काढण्यात आली. यावेळी आभूषणांच्या दर्शनासाठी (Darshan) भाविकांनी (Devotes) रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. त्यानंतर ही आभूषणे मंदिरात नेण्यात आली. दरम्यान पंचामृताने देवीच्या उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. भरजरीचे महावस्त्र नेसविण्यात आले. सांजशृंगारानंतर श्री भगवतीस आभूषणे परिधान करण्यात आले. त्यात सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे पुतळी गाठले, सोन्याचा कोयरीहार, सोन्याची वज्रटीक, सोन्याची बोरमाळ, सोन्याचे कर्णफुले, सोन्याची नथ, सोन्याचे पाऊल, सोन्याचा गुलाबहार आदि आभूषणांचा समावेश आहे.
हे देखील वाचा : Nashik News : भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
दरम्यान,आजची पंचामृत महापूजा (Mahapuja) प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी केली. तसेच प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष बी. व्ही. वाघ, पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांच्या उपस्थितीत श्री भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात आली. यावेळी मंदिराच्या गाभार्यातील उजव्या बाजू विविध धर्मीय ११११ घटाची स्थापना दुपारी १२ वाजता करण्यात आली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा