नाशिक | Nashik
येथे २०२७ साली सिंहस्थ कुंभमेळा (Kumbh Mela) होणार असून या पार्श्वभूमीवर आतापासूनच प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे. परंतु, त्याआधीच साधू-संतांमध्ये नामकरण आणि शाही स्नानाच्या अधिकारावरून वाद उफाळून आल्याचे दिसत आहे. त्यानंतर आता नाशिकमधील (Nashik) तपोवन परिसरात (Tapovan Area) असणाऱ्या मोदी मैदानावरून (Modi Ground) वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP Sharad Pawar Group) आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन येथील मैदानाला कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीचे नाव न देता त्या मैदानाचे नाव ‘कुंभमेळा मैदान’ असे कायमस्वरुपी नामकरण करावे”, अशी मागणी नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच “या नावाचा फलक देखील लावण्यात यावा, जेणेकरुन कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटक व यात्रेकरुंना समजेल की या ठिकाणापासून कुंभमेळ्याला दरवर्षी सुरुवात होते. तसेच महापालिकेने त्याठिकाणी साधूग्राम नावाचा फलक उभारला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन (Agitation) करून फलक उभारेल. याशिवाय विधिवत पूजा विधी करून त्याचा नामांतर करेल”, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आला आहे.