Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik News : भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष

Nashik News : भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष

नाशिक | Nashik

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर नाशिकमध्ये (Nashik) पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने ढोल ताशे वाजवून, फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष करण्यात आला.

- Advertisement -

नाशिक येथील भुजबळ फार्म (Bhujbal Farm) कार्यालय व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय मुंबई नाका येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले.

YouTube video player

दरम्यान, याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले, प्रदेश पदाधिकारी गोरख बोडके, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, शहराध्यक्षा कविता कर्डक, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे,युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, संजय खैरनार,पूजा आहेर, आशा भंदुरे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा- राज्य निवडणूक आयुक्तांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच...