Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : जिल्ह्यात २४ जानेवारी रोजी 'नो फ्लाय झोन' मनाई आदेश

Nashik News : जिल्ह्यात २४ जानेवारी रोजी ‘नो फ्लाय झोन’ मनाई आदेश

नाशिक | Nashik

केंद्रीय गृह,सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) हे शुक्रवार (दि.२४ जानेवारी) रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर (Nashik District Tour) येणार आहेत. या दौऱ्यानिमित्त ते जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व मालेगाव येथे भेट देणार आहेत. त्यांची सुरक्षितता लक्षात घेता, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिक जिल्ह्यात दि. २२ जानेवारी ते दि. २४ जानेवारी २०२५ या कालावधीत ड्रोन उड्डाणास प्रतिबंधित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिले आहेत.

- Advertisement -

उपरोक्त कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था (Law and order) अबाधित राखण्याच्या दृष्टीने नो ड्रोन फ्लाय झोन घोषित करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे ड्रोन (मानवरहित साधन), पॅरा ग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हॉटएअर बलून्स, मायक्रोलाईटस् एअरक्राफ्ट आदी तत्सम हवाई साधनांमार्फत सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय ड्रोनचे उड्डाण/ वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील (ग्रामीण) ड्रोन चालक व मालकांनी सदर परिसरात २२ ते २४ जानेवारी २०२५ या कालावधीत ड्रोनचे उड्डाण करू नये. तसेच नाशिक जिल्ह्यात ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या छायाचित्रीकरणाच्या (Photography) परवानगी बाबतचे संपूर्ण अधिकार प्रशासनाने राखून ठेवले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरूद्ध भारतीय दंड विधान कलम, इंडियन एअर क्राफ्ट कायदा आणि इतर प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...