नाशिक | Nashik
प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्यावतीने (Obstetrics and Gynecology Association) बुधवारी लेझीम खेळत येत गणरायाला प्रतिष्ठापित केले. गणपती (Ganpati) स्थापनेचे यंदाचे हे पहिलेच वर्ष आहे. शालिमार येथील आयएमए हॉलच्या पटांगणात गणेशाची स्थापना करण्यात आली.
मुली आणि स्त्रियांमध्ये (Girls and Women) आजच्या काळात भेडसावणाऱ्या आजाराविषयी जनजागृती करण्याचा संघटनेचा मानस आहे. त्यामुळे गणपतीची आरास म्हणून वेगवेगळे स्त्री आरोग्यविषयक फलक वापरण्यात आले आहेत. सामाजिक भान जपत यंदा उत्सव गणेश मंडळाच्या माध्यमातून स्त्रियांच्या आरोग्याबाबत समाजप्रबोधन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
गणपती स्थापनेसाठी संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष डॉ. नेहा लाड, दै. देशदूतचे सल्लागार संपादक शैलेंद्र तनप्रे सचिव डॉ. गौरी पिंपराळेकर, विश्वस्त मंडळ डॉ. रमेश देसले, डॉ. अभय सुखात्मे, डॉ. वसंत कवडे, डॉ. अरुणा वानखेडे, डॉ. सुचेता बच्छाव, डॉ. नलिनी बागुल, डॉ. नीलेश निकम, सचिव डॉ. मनीषा जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. पारंपरिक महाराष्ट्रीयन लेझीम पथक तयार करून गणेश स्थापनेच्या वेळी केलेले शानदार लेझीम सादरीकरण आकर्षणाचा
विषय ठरले.
दरम्यान, या पथकात डॉ. अपर्णा उपाध्ये, डॉ. प्रेरणा शिंदे, डॉ. मीनल रणदिवे, डॉ. माधवी मुठाळ, डॉ. कविता गाडेकर, डॉ. वनश्री कुलकर्णी, डॉ. सोनल काळे, डॉ. स्वप्ना कुलकर्णी, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. निखिल सोनवणे, डॉ. पंकज भदाणे आदी सहभागी होते. गणपती स्थापनेच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. वर्षा बस्ते, डॉ निवेदिता पवार, डॉ. कांचन देसले, डॉ. नीलिमा कुलकर्णी, डॉ. वैशाली राजाध्यक्ष, डॉ. समीर पवार, डॉ. प्रविणा पवार, डॉ. प्रदीप पवार यांची उपस्थिती होती. स्त्रीरोग तज्ज्ञांकडून मार्गदर्शन हवे असल्यास नागरिकांनी (Citizen) आयएमए हॉल येथे दि.४ सप्टेंबरपर्यंत अवश्य भेट द्यावी, असे आवाहन नाशिक स्त्री रोगतज्ज्ञ संघटनेने केले आहे.





