Monday, September 28, 2026
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ओंकार पवार यांची नियुक्ती

मोठी बातमी! नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ओंकार पवार यांची नियुक्ती

नाशिक | Nashik

मागील आठवड्यात नाशिक जिल्हा परिषदेच्या (Nashik Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Ashima Mittal) यांची जालना (Jalna) येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानंतर आता सरकारकडून मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ओंकार पवार (Omkar Pawar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पवार हे इगतपुरी त्र्यंबकेश्वर उपविभागाचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यानंतर आज सरकारकडून त्यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते उद्याच (बुधवारी) आपल्या पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

ओंकार पवार हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (IAS) असून त्यांची पहिली नियुक्ती इगतपुरीमध्ये होती. ते १६ ऑक्टोबर २०२४ पासून इगतपुरी येथे कार्यरत होते. या काळांत त्यांनी इगतपुरी व त्र्यंबकेश्वरसाठी (Igatpuri and Trimbakeshwar) चांगले निर्णय घेतल्याने त्यांचे या भागातील नागरिकांनी स्वागत केले होते. यानंतर आता त्यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्याचे आदेश व्ही. राधा यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...