Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : नायलॉन मांजा ठरला घातक; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

Nashik News : नायलॉन मांजा ठरला घातक; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

नाशिक | Nashik

जिल्ह्यात पतांगोत्सवाची धूम सुरू असताना मकरसंक्रांतदिनी नायलॉन मांजाने (Nylon Manja) गळा कापल्याच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. तर नाशिक शहरात एकाचा मांजाने गळा कापल्याने मृत्यू झाला आहे. ऐन सणासुदीच्या दिवशी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

यातील एक घटना येवला तालुक्यातील (Yeola Taluka) पारेगाव येथील दत्तात्रेय जेजुरकर (वय ३०) दुचाकीने येवल्याकडे येत असताना पारेगाव रोडवर मंगळवारी, (दि. १४) दुपारच्या सुमारास सदर घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या जेजुरकर यांना तातडीने नजीकच्या डॉ. सोनावणे हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने ४१ टाके घालण्यात आल्याचे डॉ. आर. एम. सोनवणे यांनी सांगितले.

तसेच सिन्नर घोटी महामार्गावर (Sinner Ghoti Highway) लोणारवाडी शिवारात सोनांबे येथील युवकाचा नायलॉन मांजाने दुचाकीवरील युवकाचा गळा कापला आहे. श्वसन नलिकेच्या आतमध्ये असलेला ट्रकिया या भागाला त्याला गंभीर दुखापत झाली आहे.त्याच्यावर सिन्नर येथे स्थानिक पातळीवर उपचार शक्य नसल्याने त्याला नाशिकच्या सोपान रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यासोबतच नाशिक पुणे महामार्गावरील संगमनेर नाका परिसरात दुचाकी धारक रस्त्याने जात असताना त्यांच्या गळ्याला नायलॉन मांजा लागला. पण सुदैवाने हेल्मेट व गळ्याला रुमाल असल्याने नायलॉन मांजा जर्किंग मधून आत जात शर्ट व जर्किंग या मांजामुळे फाटला. सुदैवाने त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत गाडी थांबवली व मागील येणाऱ्या वाहनांना याची सूचना देत त्यांनाही या नायलॉन माझ्यापासून वाचवले.यावेळी रस्त्यावर दुचाकी धारक थांबले होते.

तर सोमवारी (दि. १३) भोगीला नायलॉन मांजामुळे येवला तालुक्यातील तीन विविध घटनेत पाच वर्षीय चिमुकल्यासह दोघे तरुण गंभीर जखमी झाले. नायलॉन मांजाने पाच वर्षीय देवराज दीपक कोटमे याचा गळा कापल्या गेल्याने त्याला १४ टाके घालावे लागले. शुभम सजन पवार या तरुणालाही नायलॉन मांजाने गळ्याला इजा होवून २० टाके पडले. तर तिसऱ्या घटनेत अंदरसुल येथील दीपक राऊळ या तरुणाच्या गळ्यालाही मांजा अडकल्याने त्यालाही २० टाके घालावे लागले.

दरम्यान, वरील घटनांसोबतच या नायलॉन मांजामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी आज अनेकांचे गळे आणि हात चिरलेले दिसून आले. यामुळे यावर ठोस उपाय अजूनही झालेला नसल्याने नागरिकांनी तीव्र अशी नाराजी व्यक्त केली आहे. तर नायलॉन मांजा बंदी हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत असल्याचे दिसत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...