Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनाशिक शहरात आज आढळून आलेला करोनाबाधित काठे गल्लीतला; त्रिकोणी गार्डनच्या पाठीमागील परिसर...

नाशिक शहरात आज आढळून आलेला करोनाबाधित काठे गल्लीतला; त्रिकोणी गार्डनच्या पाठीमागील परिसर सील

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात आज एक करोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण कठडा येथील डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आहे. आजच्या वाढलेल्या रुग्णामुळे नाशिक शहरातील रुग्णसंख्या ४० वर पोहोचली आहे. हा रुग्ण काठे गल्लीतील असून त्रिकोणी गार्डनच्या पाठीमागील परिसर सील करण्यात आला आहे. याठिकाणी लवकरच मनपाच्या आरोग्य विभागाकडून तपासणी केली जाणार आहे.

- Advertisement -

नाशिक शहरात आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या २८ वर पोहोचली आहे. तर एकूण रुग्णांची संख्या ४० वर पोहोचली आहे.  आज डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात नियमित कर्मचाऱ्यांची आरोग्य सेवकांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कोविड -१९ तपासणी नमुना घेण्यात आला होता.

दोन दिवसांपूर्वी हा नमुना तपासणीला पाठविण्यात आला होता. या रुग्णाला कुठलाही कुठल्याही प्रकारचा त्रास अथवा लक्षणे नव्हती. परंतु त्यांचा तपासणी नमुना कोरोना कोविड-१९ बाधित असल्याचा अहवाल आज प्राप्त झाल्याने  चिंता व्यक्त केली जात आहे.

करोनाबाधित सुरक्षारक्षकाला डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाचे घर द्वारका परिसरातील काठे गल्ली येथील त्रिकोणी गार्डन परिसरात आहे. नियमित घरी ये-जा असल्यामुळे हा परिसर सील करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काढले असून आरोग्य विभागाच्या पथकाकडून परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच संशयित, एकूण घरांना दिलेल्या भेटी याबाबतचा सविस्तर दैनंदिन अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या