त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar
येथे कायमस्वरूपी भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी (Darshan of Trimbakraj) भाविकांची (Devotees ) गर्दी पाहायला मिळते. मात्र, अनेकांना घरी परत जाण्याची घाई असल्याने त्यांच्यासाठी प्रती व्यक्ती दोनशे रुपये देणगी दर्शनासाठी सुविधा करण्यात आली आहे.या योजनेमुळे भाविक देणगी दर्शनासाठीच रांगा लावून एका जागी गर्दी करु लागले आहेत. परंतु, दुसरीकडे हा विषय वादग्रस्त होऊ लागला आहे.
दिपावली पाडवा (दि.०२ नोव्हेंबर २०२४ पासून देवस्थानच्या वतीने रोज दोन हजार भाविकांनी कुठूनही ऑनलाईन दर्शनासाठी बुकिंग करण्याची तर दोन हजार भाविकांनी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे प्रत्यक्ष बुकिंग सुविधा कुशावर्त तीर्था लगत व देवस्थानच्या शिवप्रसाद इमारतीत सोय करुन दिली आहे. त्यामुळे एका जागेवर होणारी गर्दी पांगली असून भाविक कुशावर्तावर ऑनलाईन पास (Online Pass) घेण्यासाठी जात असल्याने येथे भाविकांना प्रसिद्ध तीर्थाचे दर्शन होत आहे.
तसेच आतापर्यंत मंदिर चौकात गर्दी होऊन तेथूनच भाविक माघारी परतत असतं.यामुळे त्याच चौकातील व्यावसायिकांना फायदा होत असे. पंरतु, सध्या दोन ठिकाणी सोय असल्याने दोन्ही ठिकाणी भाविक पोहचत असून ऑनलाईन सुविधा (Online Facility) उपलब्ध होते व तेथील व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे.याशिवाय कुशावर्त तीर्थाचे दर्शन भाविकांना होत असून भाविक येथे गोदावरी नदीच्या तीर्थाचे पुजन व दर्शनासाठी येऊ लागले आहेत. मात्र याआधी भाविक मंदिरात दर्शन घेऊन माघारी जात असल्याने त्यांना या तीर्थाचे माहिती होत नव्हती. पंरतु, ऑनलाईन सुविधेमुळे सध्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी भाविक येऊ लागले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा