Monday, January 26, 2026
HomeनाशिकNashik News : त्र्यंबकेश्वर मुख्याधिकाऱ्यांची चौकशी; जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल, प्रकरण काय?

Nashik News : त्र्यंबकेश्वर मुख्याधिकाऱ्यांची चौकशी; जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल, प्रकरण काय?

स्थानिक रहिवाशांत समाधान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या (Trimbakeshwar CEO) कार्यपध्दतीबाबत जलसंपदामंत्री व सिंहस्थमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या समक्ष स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारींची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. प्राप्त सर्व तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी उपविभागीय अधिकारी ओंकार पवार यांना दिले आहे. त्यानुसार चौकशी सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये भरणारा सिंहस्थ निर्विघ्न पार पाडण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे. गतवेळपेक्षा यंदा चारपट अधिक भाविक (Devotes) येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. त्र्यंबकेश्वरमधील मर्यादीत जागा हा सर्वात मोठ अडचणीचा मुद्दा असून पाकिंगसह गोदावरी स्वच्छतेबाचतचे अनेक मुद्द्यांवर काम सुरू आहे. या एकूणच पार्श्वभूमीवर जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथील विविध ठिकाणांची काही दिवसांपूर्वी पाहणी केली.

YouTube video player

यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसह आखाड्यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. या पाहणीवेळी स्थानिक नागरिकांनी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचक्के (Shirya Devchakke) यांच्या कार्यपध्दतीबाबत नाराजी व्यक्त केली. अतिक्र मणांच्या नावाखाली नियमबाह्य पध्दतीने घरांवर कारवाई झाल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. याशिवाय माझी वसुंधरा उपक्रमासाठी मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेचा विनीयोग, पार्किंगच्या ठेक्यासह अहिल्या धरणातील ड्रेनेज लाईनचाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. मंत्र्यांसमोरच रहिवाशांनी तक्रारींचा पाढा वाचल्याने जिल्हा प्रशासनाने त्याची गंभीर दखल घ्यावी लागली आहे.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यासंदर्भात चौकशी करण्याचे पत्र इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या (Igatpuri and Trimbakeshwar) उपविभागीय अधिकारी ओंकार पवार (Onkar Pawar) यांना दिले आहे. त्यानुसार ओकार पवार यांनी त्र्यंबकेश्वर मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले असून तक्रारींसदर्भात आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. संबंधित तक्रारदार आणि अधिकाऱ्यांना तक्रारींबाबत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार असल्याचे ओंकार पवार यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनाने तक्रारींची दखल घेतल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

77th Republic Day 2026 : दिल्लीत कर्तव्य पथावर 30 विविध चित्ररथ,...

0
नवी दिल्ली | New Delhi आज भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा (77th Republic Day) केला जात आहे. यानिमित्ताने दिल्लीतील कर्तव्यपथावर लष्करी दलांकडून संचलन केले...