Thursday, May 15, 2025
Homeनाशिकआतापर्यंत तेराशे उद्योगांना परवानगी; एमआयडीसीची वेबसाईट डाऊन

आतापर्यंत तेराशे उद्योगांना परवानगी; एमआयडीसीची वेबसाईट डाऊन

सातपूर | प्रतिनिधी

- Advertisement -

शासनाने उद्योग सुरू करण्याबाबत अध्यादेश जारी करताच काल (दि २१) पहिल्या दिवशी नाशिक विभागात तेराशे उद्योगांनी अर्ज दाखल केले होते. आज सकाळपासूनच राज्यभरातून अर्ज दाखल होऊ लागल्याने एमआयडीसीची वेबसाईट डाऊन झाल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे मान्यता मिळालेल्या तेराशे उद्योगांच्या वाहन परवान्यांसह नव्या उद्योगांच्या परवान्यांसाठी अर्ज देखील अडकले असल्याची माहिती उद्योजकांनी दिली आहे.

राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या धोरणानुसार गेल्या 28 दिवसांपासून बंद असलेल्या उद्योगक्षेत्राला सुरू करण्याबाबत परवानगी देण्यात आली असून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी राज्यभरात उद्योजकांची चढाओढ सुरू झाली आहे.

यामुळे एमआयडीसीने सुरू केलेल्या परवानगीसाठीची वेबसाईट देखील बंद पडली आहे. आज सकाळपासून नव्याने परवानगी मागणारे उद्योगांची अडचण निर्माण झाली असून वेबसाइटवरून अर्ज अपलोड होत नसल्याने उद्योजकांची एमआयडीसी कार्यालय परिसरात काहीशी गर्दी झालेली बघायला मिळाली. याबाबत तांत्रिक विभाग मुंबईहून दुरूस्ती काम करीत असून लवकरच प्रश्न सुटेल असे आश्वासन प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी उद्योजकांना दिले.

दरम्यान, उद्योगांनी परवानगी मिळाल्यानंतर उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजनाला प्रारंभ केला आहे. उद्योगाच्या परवानगी मध्येच कामगारांना कंपनीत ठेवण्याची व्यवस्था करणे अथवा बस किंवा मिनीबसची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या नियोजनातही कंपनी उद्योजक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “ट्रम्प यांना कुलदैवत माना अन् गावागावात डोनाल्ड जत्रा...

0
मुंबई | Mumbai  जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) दहशतवाद्यांनी (Terrorist) केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील...