Tuesday, June 16, 2026
HomeनाशिकNashik News : संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते नजरकैदेत; पंचवटी पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

Nashik News : संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते नजरकैदेत; पंचवटी पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या व्याख्यानाच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) नजरकैदेत ठेवले आहेत. भिडे यांना विद्रोही तुकाराम हे पुस्तक भेट देण्याचा प्रयत्न करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना आज (सोमवारी) सकाळीच ताब्यात घेण्यात आले.

- Advertisement -

इंदिरानगर (Indiranagar) येथील ‘हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान कला व क्रीडा मैदान’, राणेनगर-राजीवनगर येथे आज (दि.०४) रोजी सायंकाळी ‘भारतीय स्वातंत्र्य आणि आपण’ या विषयावर भिडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर भिडे यांनी पूर्वी संत तुकाराम महाराज यांच्या तुलनेत मनू श्रेष्ठ असल्याचे केलेले वादग्रस्त विधान आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन यावर संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी भिडेंना ‘विद्रोही तुकाराम’ (लेखक-अ.हा. साळुंखे) हे पुस्तक भेट देऊन लोकशाही मार्गाने निषेध नोंदविण्याच्या तयारीत होते.

मात्र संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) जिल्हाप्रमुख प्रफुल्ल वाघ, तसेच विक्रम गायधनी, नितीन काळे, प्रेम भालेराव, लकी बावस्कर, मंदार धिवरे, राकेश जगताप, निलेश गायकवाड, संविधान गायकवाड, हिरामण वाघ यांना सकाळीच ताब्यात घेतले व नजरकैदेत ठेवले.

या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख प्रफुल्ल वाघ म्हणाले की, “आम्ही पानसरे, दाभोळकर, गौरी लंकेश यांच्यासारख्या विचारवंतांच्या विचारांचे समर्थक आहोत. भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने ‘विद्रोही तुकाराम’ हे पुस्तक भेट देणार होतो. त्यातून भिडे यांना संत तुकाराम महाराजांचे महत्त्व समजावे हा उद्देश होता. मात्र, पोलिसांनी आमच्यावर नजर ठेवत तीन दिवसांपासून अडवून ठेवले आहे”, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी गजेंद्र पाटील यांनी कार्यकर्त्यांचे (Worker) मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई (Action) केल्याचे सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १६ जून २०२६ – निवडणूक यंत्रणेच्या निष्पक्षतेची कसोटी

0
निवडणूक मुक्त, न्याय्य आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडणे ही निवडणूक आयोगाची आणि तिच्याशी संबंधित यंत्रणेची सर्वोच्च घटनात्मक जबाबदारी असते. या प्रक्रियेत सत्ताधारी असोत की...