Tuesday, October 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : मोठी बातमी! सिन्नरला पावसाचा तडाखा; बसस्थानकातील स्लॅबचा काही भाग...

Nashik News : मोठी बातमी! सिन्नरला पावसाचा तडाखा; बसस्थानकातील स्लॅबचा काही भाग कोसळला

शिवशाही बस आणि काही वाहने दबली

सिन्नर | Sinnar 

राज्यात आज मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले असून, विविध जिल्ह्यांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) ग्रामीण भागात देखील दमदार पाऊस बरसत असून, नद्या आणि नाल्यांना पूर आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र, या पावसाचा फटका सिन्नर बसस्थानकाला (Sinnar Bus Stand) बसल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

तुफानी पावसामुळे सिन्नरच्या हायटेक बसस्थानकाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण बसस्थानक रिकामा करण्यात आला आहे. तसेच प्रवाशांना (Passengers) देखील बाहेर काढण्यात आले आहे. तर या घटनेमुळे सिन्नर शहरातील सर्व रस्ते बंद झाले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे बसस्थानकातील सदर घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पंरतु, हा भाग नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, हे बसस्थानक सिन्नरचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या निधीतून उभारण्यात आलेले आहे. तसेच सध्या सिन्नर शहरात (Sinnar City) मुसळधार पाऊस सुरू असून, सरस्वती आणि देव नदीला पूर आल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 369 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज...